लासलगाव : येथील बाजार समितीस खडक माळेगाव / खानगाव (नजिक) ग्रुप ग्रामपंचायतीने परिसरातील शेतकरी बांधव व इतर मार्केट घटकांच्या सोयी व सुविधेच्या दृष्टीने मौजे खानगाव नजिक शिवारातील मोकळी जागा नियोजित उपबाजार आवाराकरिता उपलब्ध करून दिली आहे. ही जागा शासकीय दराने उपलब्ध करून देण्यासाठी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीचे मासिक सभेत ठराव संमत करून तशा ठरावाची प्रत बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांचेकडे सुपुर्द करण्यात आली.
मौजे खडक माळेगाव / खानगाव (नजिक) व परिसरातील शेतकरी बांधवांच्या मागणीवरून लासलगाव बाजार समितीने सन २००९ मध्ये मौजे खानगाव (नजिक) येथे तात्पुरते खरेदी-विक्री केंद्र सुरू करून त्या ठिकाणी सुरुवातीस द्राक्षमणी, तर माहे सप्टेंबर, २०२० पासून भाजीपाला या शेतीमालाचे लिलाव सुरू केले आहेत. या दोन्ही लिलावास परिसरातील शेतकरी बांधव व व्यापारी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून मौजे खानगाव (नजिक) येथे लासलगाव बाजार समितीचे कायमस्वरूपी उपबाजार आवार सुरू करावे, अशी मागणी होत होती.
मात्र बाजार समितीस या ठिकाणी स्वमालकीची जागा नसल्याने उपबाजार आवारासाठी लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास अडचणी येत होत्या. त्याअनुषंगाने बाजार समितीने खडक माळेगाव / खानगाव (नजिक) ग्रुप ग्रामपंचायतीकडे नियोजित खानगाव (नजिक) खडक माळेगाव उपबाजार आवारासाठी ५ हेक्टर जागा शासकीय दराने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार खडक माळेगाव व खानगाव (नजिक) ग्रामस्थांनी परिसरातील शेतकरी बांधव व इतर मार्केट घटकांच्या सोयीसुविधेच्या दृष्टीने तसेच खानगाव (नजिक) परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नुकतीच सभा घेऊन मौजे खानगाव (नजिक) शिवारातील गट नं. २ मधील जागेपैकी ३ हेक्टर ५० आर जागा लासलगाव बाजार समितीच्या नियोजित खानगाव (नजिक) खडक माळेगाव उपबाजार आवारासाठी शासकीय दराने उपलब्ध करून देण्यास संमती दिली. यावेळी बाजार समितीचे माजी सदस्य दत्ता काका रायते, नामदेव रायते (सर), भाजपा नेते विठ्ठलराव कान्हे, पंढरीनाथ रायते, पोपटराव रायते, उपसरपंच नारायण राजोळे, माजी उपसरपंच राजेंद्र रायते, अनिल शिंदे, खडक माळेगाव सोसायटीचे चेअरमन सुरेश रायते, संतू पा. रायते, विकास रायते, किरण शिंदे, भरत गारे, केशव गारे, मधुकर शिंदे, ज्ञानेश्वर गारे, अरुण शिंदे, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
इन्फाे
सर्वानुमते घेतला निर्णय
ही जागा उपबाजार आवारासाठी उपलब्ध करून देण्यासाठी खडक माळेगाव / खानगाव (नजिक) ग्रुप ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या सोनाली संदीप गारे यांनी सभेत सूचना मांडल्यानंतर त्यास कविता बापू गारे यांनी अनुमोदन दिले. गाव विकासाच्या दृष्टीने व परिसरातील शेतकरी बांधवांची जवळपास मालविक्रीची सोय व्हावी म्हणून लासलगाव बाजार समितीस जागा देण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आल्याची माहिती सरपंच सौ. तेजल रायते यांनी दिली.
फोटो- १६ लासलगाव बाजार
लासलगाव बाजार समितीच्या उपबाजारासाठी जागा देण्याचा निर्णय झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या ठरावाची प्रत सभापती सुवर्णा जगताप यांच्याकडे सुपुर्द करताना खडक माळेगाव-खानगाव नजिक ग्रुप ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य.
160821\16nsk_34_16082021_13.jpg
फोटो- १६ लासलगाव बाजारलासलगाव बाजार समितीच्या उपबाजारासाठी जागा देण्याचा निर्णय झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या ठरावाची प्रत सभापती सुवर्णा जगताप यांच्याकडे सुपुर्द करताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य.