लासलगावी कांदा दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 00:19 IST2020-12-04T22:58:11+5:302020-12-05T00:19:51+5:30
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (दि. ४) लाल व उन्हाळ कांदा दरात सातशे ते आठशे रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. कांदा बाजारपेठेत भाव कोसळल्याने कांदा उत्पादकांच्या गोटात चिंता व्यक्त केली जात आहे.

लासलगावी कांदा दरात घसरण
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (दि. ४) लाल व उन्हाळ कांदा दरात सातशे ते आठशे रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. कांदा बाजारपेठेत भाव कोसळल्याने कांदा उत्पादकांच्या गोटात चिंता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी उन्हाळ कांदा ८,७१८ क्विंटल विक्री झाला असून, किमान भाव ७०० ते २२५० रुपये, सरासरी १५५० रुपये, तर ३५०८ क्विंटल आवक झालेला लाल कांदा किमान १२०० ते ३१९० रुपये व सरासरी २६०० रुपये दराने विक्री झाला. गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ६३,४५५ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान ८०० रुपये व कमाल ४४०० रुपये तर सर्वसाधारण ३००९ रुपये दर राहिला. लाल कांद्याची ७,७२५ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान ९०० रुपये व कमाल ५०८० रुपये तर सर्वसाधारण ३६०० रुपये प्रतिक्विंटल दर राहिले.