लासलगावी संतपूजन सोहळा

By Admin | Updated: January 1, 2017 23:29 IST2017-01-01T23:29:24+5:302017-01-01T23:29:48+5:30

लासलगावी संतपूजन सोहळा

Lasalgaavi Satpuran Souvenir | लासलगावी संतपूजन सोहळा

लासलगावी संतपूजन सोहळा

लासलगाव : आध्यात्मिक अधिष्ठान असेल तरी संसाराबरोबरच परमार्थ सेवा होते व परिवार तसेच संसार अधिक सुखकारक होतो, असे प्रतिपादन महामंडलेश्वर श्री. श्री. १००८ शिवगिरी महाराज यांनी येथे बोलताना केले. येथील शिवकमल मंगल कार्यालयात नववर्षानिमित्त संतपूजन सोहळा पार पडला. जनार्दन स्वामी भक्तपरिवाराच्या वतीने विमलगिरी महाराज तसेच महामंडलेश्वर शिवगिरी, स्वामी पिनाकेश्वर नंदगिरी, महंत गणेशानंद महाराज, महंत चैतन्य नंदगिरीजी महाराज, महंत ज्ञाननंद महाराज , महंत योगेशानार्थ महाराज, महंत निर्मल चैतन्य महाराज ,महंत कैलास नंदिगरीजी महाराज, महंत रामचंद्र गिरी महाराज यांचा सत्कार व पाद्यपूजन लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत होळकर, मर्चण्ट्स बँकेचे अध्यक्ष संजय कासट, प्रकाश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, भैरू महाराज, रामदास इंगळे, बाबासाहेब इंगळे, श्याम मालपाणी, दिलीप पानगव्हाणे, बाळासाहेब होळकर, उत्तम वावधाने, भानुदास कांगणे, देवेंद्र फाफाळे यांच्या हस्ते करण्यात आला. महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, स्वामी पिनाकेश्वर नंदिगरी महाराज, महंत गणेशानंद महाराज, महंत चैतन्य नंदगिरी महाराज, महंत ज्ञाननंद महाराज , महंत योगेशानाथ महाराज, महंत निर्मल चैतन्य महाराज, महंत कैलास नंदगिरी महाराज, महंत रामचंद्रगिरी महाराज तसेच लासलगाव मर्चण्ट्स बॅँकेच्या संचालक अर्चना पानगव्हाणे यांनी भाषणात विमलगिरी महाराज यांच्या धार्मिक कार्याचा गौरव केला. प्रारंभी जनार्दन स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गणेश इंगळे, भैरू महाराज, शैलेश भोर, योगेश क्षीरसागर, वाळके, ज्ञानेश्वर इंगळे, ईश्वर केंगे, वाळके, भाऊसाहेब बिन्नर, मुद्दसर शेख उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. (वार्ताहर) लासलगावी नववर्षदिनी संतपूजन कार्यक्र मप्रसंगी विमलगिरी महाराज, महामंडलेश्वर शिवगिरी महाराज. समेवत जयदत्त होळकर, संजय कासट, प्रकाश पाटील, पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, भैरू महाराज, बाबासाहेब इंगळे, श्याम मालपाणी आदि.

Web Title: Lasalgaavi Satpuran Souvenir