शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

लेंडेझरी वनपरिक्षेत्रात गैरव्यवहार ?

By admin | Updated: October 26, 2016 01:00 IST

लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील विविध कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची माहिती आहे.

गंगापूर : येथे आपल्या विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेला मूक मोर्चा शांततेत पार पडला. जिल्हाभरातून आलेले पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, मुले, मुलींच्या सहभागामुळे गंगापुरातील सर्वच रस्ते गर्दीने फुलून गेले होते.कोपर्डी प्रकरण जलदगती चालवून सहा महिन्यांच्या आत आरोपींना शिक्षा द्यावी, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी तात्काळ या कायद्यात बदल करण्यात यावा, विद्यार्थ्यांना ईबीसी सवलत मिळवण्यासाठी घालण्यात आलेली ६० टक्के गुणाची अट काढून विनाअट ईबीसी सवलत देण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे स्मारक २०१७ अखेरपर्यंत पूर्ण करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.या मोर्चात प्रेरणा पाटील, भाग्यश्री नरोडे, सुधा गावंडे, नम्रता देशमुख, शुभांगी देशमुख, तारा झिम्मन, भाग्यश्री यादव या तरुणींनी मनोगत व्यक्त केले. जि.प. शाळेच्या मैदानावरून सुरुवात झालेल्या या मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ यांची वेशभूषा केलेल्या लहान मुलांनी सर्वांचे लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणेश मंदिर, मारुती चौक, तीनकोनी, राजीव गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकामार्गे तहसील कार्यालयात या मोर्चाची सांगता झाली. गंगापूर शहरासह मोर्चा निघालेल्या मार्गावर मोठमोठे फलक, झेंडे, लाऊडस्पीकर यंत्रणा, ड्रोन कॅमेरे, वॉकीटॉकीसह पोलीस यंत्रणा, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, सर्व खबरदारीच्या उपाययोजना संयोजकांतर्फे करण्यात आल्या होत्या. मोर्चामध्ये तालुक्यातील सर्व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली; मात्र व्यासपीठावर केवळ निवेदन देणाऱ्या तरुणींनीच संचलन केले. मोर्चा आटोपताच स्वयंसेवकांनी शहरातील मोर्चाच्या मार्गात स्वच्छता मोहीम राबविली. विशेष म्हणजे या मोर्चात अमन सोशल फाऊंडेशन, व्यापारी महासंघ, आझाद हिंद मंडळ, नाभिक महासंघ, पंचायत नुरानी ग्रुप, ब्राह्मण महासंघाने मोर्चात सहभागी नागरिकांसाठी पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.