शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
5
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
6
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
7
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
8
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
9
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
10
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
11
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
12
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
13
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
14
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
15
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
16
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
17
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
18
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
19
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
20
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आजपासून ‘लेक शिकवा’ अभियान

By admin | Updated: January 2, 2017 23:10 IST

शासनाचे शाळांना परिपत्रक : २६ जानेवारीपर्यंत राबविणार विविध शैक्षणिक उपक्रम

पेठ :विद्या हे धन आहे रे,
श्रेष्ठ साऱ्या धनाहून,
तिचा साठा ज्यापाशी,
तोच खरा धनवान
वरील काव्यपंक्तीत विद्येचे महत्त्व सांगून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून (दि. ३) राज्यात ‘लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी व परंपरांच्या जाळ्यात गुरफटलेल्या समाजात स्त्रीला तुच्छ व भोगवस्तू म्हणून पाहिले जात होते. अशा परिस्थितीत समाजाचा रोष पत्करून स्त्रियांना चूल व मूल यांच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी सावित्रीबार्इंनी प्रयत्न सुरू केले. पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून त्यांनी या चळवळीचा पाया रचला. आजच्या विद्यार्थी व समाजाला सावित्रीबार्इंच्या सामाजिक कार्याची आवड व प्रेरणा मिळावी यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापर्यंत ‘लेक शिकवा’ अभियान राबविण्याचा शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. मुलींच्या शिक्षणात खंड न पडणे, शिक्षणाला प्रतिष्ठा व अधिष्ठान प्राप्त करून देणे, स्थलांतरित मुलींच्या शिक्षणासाठी उपाययोजना राबविणे यासाठी या अभियानात विविध उपक्र म राबविण्यात येणार आहेत. ३ जानेवारी रोजी ग्रंथदिंडी काढून सावित्रीबार्इंना अभिवादन करण्यात यावे, अभियान काळात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन व वाचन, वक्तृत्व स्पर्धा, वाचन प्रेरणा, माता व किशोरवयीन मुलींचे मेळावे  घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)