शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

मजूर-शेतकऱ्यांमधील वादाने शेतीकामावर विपरीत परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:47 IST

गिरणारे, धोंडेगाव परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांनी एकमेकांच्या विरोधात पुकारलेल्या असहकाराचा फटका दोन्ही बाजूकडील शेतकरी व शेतमजुरांना होत असून, त्याचा परिणाम शेतीकामांवर होत असल्याचे पाहून गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या प्रयत्नामुळे मजूरवर्ग शेतीच्या कामाला वाळू लागला आहे.

गंगापूर : गिरणारे, धोंडेगाव परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांनी एकमेकांच्या विरोधात पुकारलेल्या असहकाराचा फटका दोन्ही बाजूकडील शेतकरी व शेतमजुरांना होत असून, त्याचा परिणाम शेतीकामांवर होत असल्याचे पाहून गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या प्रयत्नामुळे मजूरवर्ग शेतीच्या कामाला वाळू लागला आहे. परंतु त्याला मिळत असलेला प्रतिसाद व दोन्ही बाजूंकडून घेतली जाणाºया ताठर भूमिकेमुळे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी स्वत:च गावोगावी जाऊन मजूर व शेतकºयांच्या मनातील गैरसमज, भीती दूर करणार आहेत.गिरणारे परिसरातील शेतकरी व धोंडेगावाकडून येणाºया एका शेतमजूर व शेतकरीमध्ये किरकोळ वाद होऊन त्याचे पर्यावसान मारहाणीत झाल्याने चिडलेल्या शेतमजुराने ही घटना आपल्या सहकाºयांना सांगून त्याचे रूपांतर वादात झाले होते. मात्र पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, सरपंच, दोन्ही बाजूकडील ग्रामस्थ, तहसीलदार यांच्या मध्यस्थीने सर्ववातावरण शांत होत असताना काही समाजकंटक त्याला वेगळे वळण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना व वेगवेगळ्या मार्गाने वाद वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे जाणून खुद्द तहसीलदार व त्यांच्या पथकाने सकाळी पहाटे ५ वाजता त्या भागाचा दौरा करून त्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. गिरणारे पंचक्रोशीतील शेतमजूर व शेतकºयांनी आपसातील मतभेद विसरून पुन्हा कामाला लागणे गरजेचे आहे. मजुरांच्या असहकारामुळे शेतकºयांनी आपल्या घरातील सर्व मंडळींना कामावर लावून शेतातली कामे करून घेण्यास सुरुवात केली आहे. अजूनही मजुराच्या मनातील भीती गेली नसल्याने लवकरच जिल्हा प्रशासनाच्या वतीने मजुरांच्या गावो गावी जाऊन त्यांची समजूत घातली जाणार असल्याचे नाशिकचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी सांगितले.शेतक-यांचे नुकसान टळलेविशेष करून टमाट्याचे खूड करून होणारे नुकसान टाळले आहे. ज्या शेतकºयाकडे बागाईत क्षेत्र जास्त त्याने पर्यायी व्यवस्था म्हणून शहरातील इतर भागातून मजूर आणून आपले काम उरकते केले आहे, तर दुसºया बाजूला काही मजुरांकडे घरची शेती असल्याने त्यांनी वातावरण शांत होईपर्यंत काम सुरू केले आहे. त्यामुळे पूर्वी गाड्या भरून येणाºया मजूर आता एकटे दुकटे एसटी बस अथवा दुचाकीने शेतक-याकडे कामाला येत आहेत.धोंडेगावच्या झालेल्या बैठकीत मजुरांनी दोन दिवसांनंतर कामावर येण्यास सांगितले होते मात्र दोन दिवस होऊनही मजूर कामावर आले नाही त्यामुळे आता गावोगावी जाऊन मजुरांना कामावर येण्याचे आवाहन करणार आहे.- शिवकुमार आवळकंठे, तहसीलदार

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपNashikनाशिक