लासलगावी दुर्गामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ

By Admin | Updated: September 8, 2016 00:30 IST2016-09-08T00:30:10+5:302016-09-08T00:30:18+5:30

लासलगावी दुर्गामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ

Laalgawi Durgamata Idol Pranpritishtha celebrations started | लासलगावी दुर्गामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ

लासलगावी दुर्गामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ

 लासलगाव : येथील गणेशनगरातील देवी चौक येथे दुर्गामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मंगळवारपासून (दि. ६) प्रारंभ झाला. भक्तिमय वातावरणात व ढोल-ताशाच्या गजरात मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. जयपूर येथून खास बनवून आणलेल्या दुर्गामाता मूर्तीचे ठिकठिकाणी महिलांनी पूजन केले. सर्व प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली होती.
लासलगावच्या माजी सरपंच कुसुमताई होळकर, सरपंच संगीता शेजवळ तसेच दुर्गामाता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत पवार, उपाध्यक्ष लक्ष्मण सांगळे, सचिव नामदेव उगले, खजिनदार विनोद सूर्यवंशी, सहखजिनदार अरुण राऊत, विश्वस्त वृषाली अहेर, रत्नमाला पवार, दिनकर निकम, शिवाजी घुमरे, विनोद चोरडिया, सुनील काळे, वसंतराव भावसार, डॉ. सुभाष वाघमोडे आदिंसह शेकडो महिला-पुरुष ग्रामस्थ मिरवणुकीत सहभागी झाले होते.
दुर्गामाता मूर्ती प्रतिष्ठापना तसेच कलश व ध्वजारोहण सोहळा शुक्रवारपर्यंत (दि. ९) चालणार आहे, अशी ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत पवार यांनी देऊन उपस्थितांचे स्वागत केले. गुरुवारी (दि. ८) सकाळी ११ वाजता श्री श्री १००८ महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांच्या हस्ते व लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या विशेष उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. (वार्ताहर)लासलगाव येथील गणेशनगरातील दुर्गामाता मंदिरातील मूर्ती मिरवणुकीत सहभागी झालेले भाविक.

Web Title: Laalgawi Durgamata Idol Pranpritishtha celebrations started