"महाराष्ट्रातील २२ आमदार फुटतील अन् लवकरच भाजपाचे मंत्रिमंडळ स्थापन होईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 10:24 IST2022-06-21T10:19:10+5:302022-06-21T10:24:38+5:30

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे १७ आमदारांसह नॉट रिचेबल आहेत.

Krishnadevanand Maharaj has claimed that a BJP cabinet will be formed in Maharashtra soon. | "महाराष्ट्रातील २२ आमदार फुटतील अन् लवकरच भाजपाचे मंत्रिमंडळ स्थापन होईल"

"महाराष्ट्रातील २२ आमदार फुटतील अन् लवकरच भाजपाचे मंत्रिमंडळ स्थापन होईल"

नाशिक- राज्यातील २२ आमदार फुटतील आणि राज्यात लवकरच भाजपाचे मंत्रिमंडळ स्थापन होईल, असा दावा जामनगर सौराष्ट्र येथील जगद्गुरू सुर्याचार्य कृष्णादेवनंद गिरीजी महाराज यांनी आज केला आहे. आज सकाळी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. 

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे १७ आमदारांसह नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांचे गुरू असल्याचा दावा करणाऱ्या कृष्णदेवनंद यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे भाजपाचे सरकार यावे आणि सर्व आमदार सुरक्षित राहावे यासाठी श्री त्र्यंबकेश्वर येथे अभिषेक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी समर्थ रामदास स्वामी यांनी अभिषेक केला त्यानुसार आपण अभिषेक करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

Web Title: Krishnadevanand Maharaj has claimed that a BJP cabinet will be formed in Maharashtra soon.