इच्छुक उमेदवारांना धमकावण्याचे प्रकार

By Admin | Updated: January 20, 2017 01:06 IST2017-01-20T01:06:02+5:302017-01-20T01:06:17+5:30

महिला उमेदवारांना होतोय त्रास

Kind of intimidating candidates | इच्छुक उमेदवारांना धमकावण्याचे प्रकार

इच्छुक उमेदवारांना धमकावण्याचे प्रकार

नाशिक : प्रत्येक प्रभागात इच्छुकांचे मोठे पीक असल्याने उमेदवारीसाठी चुरसही निर्माण झाली आहे. राजकीय पक्ष तसेच अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने आपल्यालाच तिकीट मिळावे किंवा मतांमध्ये कुणी वाटेकरी होऊ नये म्हणून काही अतिउत्साही इच्छुकांकडून धमकीसत्र सुरू झाल्याची चर्चा आहे. शहरातील काही भागांत इच्छुक असलेल्यांना प्रभागातील टारगट इच्छुक उमेदवारांकडून धमकी दिली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. विशेषत: महिला उमेदवारांचे पती प्रतिस्पर्धी ठरू शकणाऱ्या उमेदवारांना घरी जाऊन धमकी देत असल्याची चर्चा आहे. शहरातील पंचवटी परिसरात असे प्रकार घडले असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. प्रभागात प्रचार करीत फिरायचे नाही, बैठका घ्यायच्या नाहीत अशा स्वरूपाच्या धमक्यांमुळे निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांना धडकी भरली आहे. शहरात कमी अधिक प्रमाणात असे प्रकार घडत आहेत. मात्र पोलिसांपर्यंत अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. असे असले तरी पोलिसांनी प्रभागांमधील घडामोडींवर लक्ष केंद्रित केले असल्याचे समजते.

Web Title: Kind of intimidating candidates