चौथ्या मजल्यावरून कोसळून युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:58 IST2019-02-15T00:57:40+5:302019-02-15T00:58:27+5:30
दिंडोरी नाका येथील हरिभाई अग्रवाल चाळच्या शेजारी असलेल्या अग्रसेन टॉवर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या संजय केशव सोनवणे (३५) या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

चौथ्या मजल्यावरून कोसळून युवक ठार
पंचवटी : दिंडोरी नाका येथील हरिभाई अग्रवाल चाळच्या शेजारी असलेल्या अग्रसेन टॉवर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या संजय केशव सोनवणे (३५) या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, संजय सोनवणे हे अग्रसेन टॉवर इमारतीत चौथ्या मजल्यावर राहत होते. सोमवारी (दि.११) दुपारी चार वाजेच्या सुमारास ते चौथ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली पडल्याने त्यांच्या डोके, हात-पायसह कमरेला गंभीर मार लागला होता. त्यांना सुरु वातीला उपचारार्थ एका खासगी रु ग्णालयात व नंतर तेथून जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. एन. सय्यद करीत आहेत.