भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:43 PM2018-10-12T23:43:53+5:302018-10-13T00:42:39+5:30

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत देवरगावच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर त्याच्या पाठीमागे बसलेला युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़१२) सायंकाळच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील कामगारनगरजवळील ऋषभ कंपनीसमोर घडली़

Killed the truck in a truck | भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार

Next

नाशिक : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत देवरगावच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर त्याच्या पाठीमागे बसलेला युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़१२) सायंकाळच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील कामगारनगरजवळील ऋषभ कंपनीसमोर घडली़ योगेश कैलास मोंढे (२४, रा़ देवरगाव) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून, रवि पांडुरंग मोंढे (२२, रा़ देवरगाव) हा गंभीर जखमी झाला आहे़
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवरगाव येथील योगेश मोंढे व रवि मोंढे हे सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीत कामास होते़ शुक्रवारी सायंकाळी कंपनीतून सुटी झाल्यानंतर हे दोघेही दुचाकीने (एमएच १५, जी ३४१६) देवरगावला जात होते़ कामगारनगरमधील ऋषभ कंपनीसमोर मोडासा रोडलाइन्सच्या भरधाव ट्रकने (जीजे ३१, टी २३०७) त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली़ यामध्ये योगेश मोंढेच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर रवि मोंढे हा दूरवर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला़ दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला़
मयत योगेश मोंढे याचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झालेला असून, त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे़ दरम्यान, या अपघाताची गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, जखमी रवि लोखंडेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

Web Title: Killed the truck in a truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.