सिडकोतील अल्पवयीन मुलाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:18 IST2019-12-13T01:17:35+5:302019-12-13T01:18:24+5:30
सिडको परिसरातील राजरत्ननगर भागात राहणाऱ्या १५ वर्र्षीय देवांग सुनील गायकवाड या अल्पवयीन मुलाचे अज्ञात इसमाने फूस लावून महिनाभरापूर्वी अपहरण केले आहे. याप्रकणी अंबड पोलीस ठाण्यात मुलाची आजी फिर्यादी छाया नामदेव निकम यांनी तक्रार दिली आहे.

सिडकोतील अल्पवयीन मुलाचे अपहरण
नाशिक : सिडको परिसरातील राजरत्ननगर भागात राहणाऱ्या १५ वर्र्षीय देवांग सुनील गायकवाड या अल्पवयीन मुलाचे अज्ञात इसमाने फूस लावून महिनाभरापूर्वी अपहरण केले आहे. याप्रकणी अंबड पोलीस ठाण्यात मुलाची आजी फिर्यादी छाया नामदेव निकम यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार देवांग हा ८ नोव्हेंबर २०१९ रोजी घरात कुणाला काहीही न सांगता रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडला; मात्र अद्याप तो परतलेला नाही. त्याचा मित्र, नातेवाइकांसह सार्वजनिक ठिकाणी कुटुंबीयांनी शोध घेतला; परंतु देवांगचा कुठेही थांगपत्ता लागू शकला नाही. यामुळे देवांगचे अज्ञात इसमाने काहीतरी कारणासाठी अपहरण केल्याची खात्री पटल्यानंतर निकम यांनी अंबड पोलिसांकडे तक्रार केली आहे. देवांगचा चेहरा गोल व नाक सरळ जाड आणि शरीरयष्टी मजबूत आहे. त्याची उंची साधारणत: ५ फूट असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांकडूनदेखील देवांगचा शोध घेतला जात आहे; मात्र अद्याप त्यांनाही यश आलेले नाही. छायाचित्रातील मुलगा कोठेही आढळून आल्यास तत्काळ त्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याला २३९२२३३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.