Khedgaon and Shindwad were hit by heavy rains | खेडगाव व शिंदवडला पावसाने झोडपलं पोगा अवस्थेतील बागा संकटात

खेडगाव व शिंदवडला पावसाने झोडपलं पोगा अवस्थेतील बागा संकटात

ठळक मुद्देहातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेतला आहे

दिंडोरी तालुक्यातील खेडगाव शिंदवड व गोंडेगाव येथे दुपारी दोन वाजता रिमझिम असा पाऊस सुरु झाला उन पाऊस असा पावसाचा खेळ सुरु होता परंतु अचानक तीन वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि काही क्षणातच गावातील नाल्याला पुर परिस्थिति निर्माण झाल्याने शिंदवड येथील फरशीवरुन पाणी वाहु लागल्याने वडनेर भैरव, खेडगाव,तिसगाव,बहादुरी आदि गावांचा संपर्क तुटला होता. या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले असुन हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेतला आहे काढणीस आलेली सोयाबीन पाण्यात असुन कापुन ठेवलेली सोयाबीन आदी पिके पाण्यात तरंगतांना दिसुन येत होती. द्राक्ष छाटणीचा हंगाम असुन पोंगा अवस्थेत बागा असुन शेतकऱ्यांना घड जिरु नये म्हणुन अधिकचा खर्च करावा लागणार आहे. टोमँटो पिके देखील पावसाने खराब होत आहे त्यामुळे आज आलेल्या पावसाने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे अचानक झालेल्या पावसाने शेतकरी मजुरांचे प्रचंड हाल झाले.

Web Title: Khedgaon and Shindwad were hit by heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.