खरवळ आरोग्य उपकेंद्र ‘लॉकडाऊन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:35 IST2020-06-26T22:59:09+5:302020-06-27T01:35:33+5:30
एकीकडे कोरोना महामारीत देवदूत बनलेल्या पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे, तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ येथील आरोग्य उपकेंद्राचे दारच बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची तत्काळ दखल घेऊन आरोग्यसेवा पूर्ववत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

खरवळ येथील बंद अवस्थेतील आरोग्यवर्धिनी केंद्र दाखविताना ग्रामस्थ.
वेळुंजे : एकीकडे कोरोना महामारीत देवदूत बनलेल्या पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे, तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ येथील आरोग्य उपकेंद्राचे दारच बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची तत्काळ दखल घेऊन आरोग्यसेवा पूर्ववत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
राज्यात मालेगावनंतर नाशिक कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. नाशिक जिल्ह्यातही काही भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणू संसर्गाने प्रहार केला आहे.
आरोग्य यंत्रणा डोळ्यात तेल घालून सक्रि यता बजावते आहे. यामुळे प्रशासनकडून दखल घेण्याची मागणी भागवत हिलीम,चंदर शेवरे, यशवंत शेवरे, उत्तम मौळे, सुभाष मौळे, मनोहर हिलीम, चंदर गावित आदींनी केली आहे.
आरोग्यवर्धिनी असलेल्या या उपकेंद्राचे दरवाजे कधी उघडणार? कामचुकार आणि मुख्यालयी न राहणाºया आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. या उपकेंद्रांना नेमणूक केलेले अधिकारी कुठे
आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
तालुका प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच आरोग्यवर्धिनी असलेल्या आरोग्य उपकेंद्राची पाहणी करून नेमलेल्या उपकेंद्र समितीशी संवाद साधायला हवा. उपकेंद्राच्या समस्या जाणून घेत त्यावर कारवाई व्हायला हवी.
- मनोहर हिलीम, रहिवासी, खरवळ
हरसूलसारख्या ग्रामीण शहरात कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. यामुळे हाकेच्याअंतरावरील खरवळ येथील आरोग्यवर्धिनीतील कर्मचाºयांच्या उदासीनतेमुळे केंद्र बंद अवस्थेत आहे. यामुळे लाखो रु पयांचे आरोग्य उपकेंद्र बांधून कर्मचाºयांच्या अनुपिस्थतीमुळे शोभेचे बाहुले बनले आहे. तसेच परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे.
- सुभाष मौळे, रहिवासी, खरवळ