शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत खांदेपालट

By admin | Updated: January 25, 2016 23:03 IST

बदल्यांची हंडी फुटली : पहिल्या टप्प्यात २४९ कर्मचारी

नाशिक : गेल्या महिनाभरापासून महापालिकेत चर्चेत असलेली बदल्यांची हंडी अखेर फुटली असून, पहिल्या टप्प्यात ११ संवर्गातील २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बदलीजागेवर रुजू न झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात तांत्रिक संवर्गातील, तर तिसऱ्या टप्प्यात वरिष्ठ-कनिष्ठ लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासन उपआयुक्त विजय पगार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ एकाच जागेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार, गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून प्रशासकीय स्तरावर माहिती संकलनाची कार्यवाही सुरू होती. अखेर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रशासनाने बदल्यांची हंडी एकदाची फोडली. पहिल्या टप्प्यात ११ संवर्गातील २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सहायक आयुक्त, अधीक्षक, सहायक अधीक्षक, नाईक/दप्तरी, शिपाई, कनिष्ठ अभियंता विद्युत, इलेक्ट्रिशियन, मिस्तरी, रोड मुकादम, उद्यान निरीक्षक आणि हेड माळी यांचा समावेश आहे. बदल्यांच्या प्रक्रियेबाबत विजय पगार यांनी सांगितले की, ३० सप्टेंबर २०१५ रोजी ज्यांचा कालावधी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक झाला आहे, त्यांनाच बदलीपात्र ठरविण्यात आले आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी, नाईक/दप्तरी, शिपाई, बिगारी आदि पदांवरील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ८० टक्के आढळून आली. परंतु कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून या पदांसाठी १२ वर्षे व त्यावरील कालावधी निश्चित करण्यात आला. सुमारे २२ संवर्गामध्ये १११० कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. तांत्रिक संवर्गातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक कनिष्ठ अभियंता, बिगारी, फायरमन, माळी, विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक या सुमारे ५३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या दुसऱ्या टप्प्यात येत्या १५ ते २० दिवसांत करण्यात येणार आहेत. सध्या करवसुलीवर परिणाम होऊ नये यासाठी वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक या संवर्गातील सुमारे ३५५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या तिसऱ्या टप्प्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहेत. सदर बदल्या करताना विभागनिहाय गरजेनुसार पदांचे वाटप करण्यात आल्याची माहितीही पगार यांनी दिली. नगररचना विभागात ज्यांना पदे हवीत त्यांना जबाबदाऱ्याही पेलाव्या लागणार आहेत. त्यासाठी त्यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे. येत्या ३० जानेवारीपर्यंत बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू व्हायचे आहे. आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचेही पगार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)