शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 23:44 IST

नांदगाव : इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.

ठळक मुद्देनांदगाव : काशीनाथ बाबांवर युवा फाउंडेशनकडून क्रियाकर्म

नांदगाव : इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.काशीनाथ शिंदे (वय वर्षे ७०, मूळ रा. वागण, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) यांचे नांदगावच्या लेंडी नदी किनाऱ्याजवळ ढवळे बिल्डिंग परिसरात त्यांचे वास्तव्य होते. शारीरिक व्याधींमुळे अधू असलेल्या बाबांना रस्त्यावरील नागरिक येता-जाता जेवण, नाश्ता द्यायचे. रात्री भिंतीच्या किंवा झाडाच्या आडोशाला बाबा झोपत असे. वाढलेली दाढी, शून्यात नजर आणि अंगभर चिंध्या झालेले कपडे, झोपायला रस्त्यालगतचा खड्डा अशा अवस्थेतले बाबाचे जिणे काही वर्षांपासून नांदगावकरांना माहिती झाले होते. ते उपाशी राहणार नाहीत एवढी काळजी घेतली जात असे; पण काही दिवसांपूर्वी काशीनाथ बाबांनी त्याच जागी अखेरचा श्वास घेतला. येथील युवा फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी या बाबांचे अंतिम क्रियाकर्म पार पाडत सामाजिक सेवेचा आदर्श घालून दिला.गेल्या काही वर्षांत सणासुदीला, दसरा, दिवाळीला शहरातील नागरिकांना काशीनाथ बाबांची आठवण होत असे. फराळ, कपडेलत्ते आपापल्या पद्धतीने अनेक जण त्यांना मदत करीत असत. आलेली मदत त्यांनी कधी नाकारली नाही; पण कोणी अधिकच चौकशी करू लागले तर त्यांना तर्कटलेल्या स्वरात उत्तर मिळायचे. म्हणून त्यांच्या पूर्वेतिहासाची निश्चित माहिती कोणालाच नव्हती. झाडाखालची जागा सोडून इतरत्र जाताना त्यांना कोणीही पाहिले नव्हते. जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा सेवा करण्याची संधी येथील युवा फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी केली. त्यांना अखेरचा निरोप देण्याची सेवाही फाउंडेशनच्या सुमित सोनवणे, प्रसाद वडनेरे, नीलेश पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे राम शिंदे यांच्या माध्यमातून घडली. नांदगाव पोलीस स्टेशनचे नाईक राकेश चौधरी, पोलीस शिपाई अमोल शिंदे यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकNashikनाशिक