केबीएच विद्यालयाचे दहावीच्या परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:29 IST2020-07-30T23:43:05+5:302020-07-31T01:29:49+5:30
नाशिक : गंगापूररोडवरील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल ९२.९३ टक्के लागला आहे. शाळेच्या १२२ विद्यार्थ्यांपैकी ११३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

केबीएच विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत मुख्याध्यापक जयवंत बोढारे, रमेश बागुल, गिरीश कोठावदे, बळीराम सोनवणे आदी.
ठळक मुद्देरोशन गोरख येलमामे ८३.६० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गंगापूररोडवरील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल ९२.९३ टक्के लागला आहे. शाळेच्या १२२ विद्यार्थ्यांपैकी ११३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रोशन गोरख येलमामे ८३.६० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला असून, वर्षा रामदास गांगोडे ही ८२ टक्के गुण मिळून द्वितीय, तर निकिता मुरलीधर चव्हाण ही ८१.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. विजय काशीनाथ बेंडकोळी व सोनाली जगन पाथरे यांनी ८०.८० गुण चवथा, तर आरती रमेश हटकर ८० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला.