निफाड महाविद्यालयाचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर

By Admin | Updated: September 16, 2014 00:07 IST2014-09-15T21:19:25+5:302014-09-16T00:07:29+5:30

निफाड महाविद्यालयाचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर

Kabaddi team at Niphad College district | निफाड महाविद्यालयाचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर

निफाड महाविद्यालयाचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर

 

निफाड : वैनतेय विद्यालय, निफाड येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय कबड्डीस्पर्धेत निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालयाच्या वर्षाआतील १९ वर्ष वयोगटातील मुलाच्या संघाने चमकदार कामगिरी करत अंतिम सामन्यात म्हाळसाकोरे विद्यालयाच्या या संघाचा पराभव केला. सदर संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर संघात मुल्ला हुसेन, नीलेश कुमावत, साहिल शेख, गणेशकवार, सौरभ ढेंगळे, गौरव झणकर, सत्यम बीवाल, अमोल देवकर, अजय मेघने, अक्षय जाधव या खेळाडूंचा समावेश आहे. सदर संघास क्रीडा संचालक दिनेश उकिर्डे, क्रीडाशिक्षक सुनील आंधळे यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)

Web Title: Kabaddi team at Niphad College district