शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

दोघी बहिणींकडून इको फ्रेण्डली गणेशोत्सवाचा जागर

By admin | Updated: September 4, 2016 01:12 IST

जनजागृती : विद्यार्थी साकारतात बाप्पाचे विलोभनीय रूप

 नाशिक : सामाजिक एकोप्याचे प्रतीक ठरत असलेला गणेशोत्सव पर्यावरण ऱ्हासास कारणीभूत ठरू नये तसेच या उत्सवाचे पावित्र्य जपले जावे याकरिता प्रत्येकांनी इको फ्रेण्डली गणेशोत्सव साजरा करावा, या भावनेतून पंचवटीतील दोघी बहिणी शहरातील शाळांमध्ये जागर करीत आहेत. जीडी आर्टचे शिक्षण घेत असलेली स्नेहा आणि श्रद्धा शिंदे या दोघी बहिणी गेल्या तीन वर्षांपासून शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन मुलांना शाडूमातीपासून गणपती बनविण्याचे मुलांना धडे देत आहेत. यासाठी ते कुठल्याही प्रकारचे मानधन घेत नाहीत. केवळ सामाजिक भावनेच्या जाणिवेतूनच त्यांनी या कार्याचा वसा घेतला आहे. दरवर्षी दहा ते बारा शाळांमधील हजारो मुलांना ते बाप्पाचे विलोभनीय रूप साकारण्यासाठी मदत करीत आहेत. केवळ मूर्तीच बनविणे शिकवित नाही, तर त्या मूर्तीची घरी प्रतिष्ठापना करावी यासाठीदेखील त्यांचा आग्रह असतो. याबाबत स्नेहाने सांगितले की, वयाच्या आठव्या वर्षापासून तिला मातीचा गणपती बनविण्याची आवड निर्माण झाली. पुढे याच क्षेत्रात काम करावे या भावनेतून तिने जीडी आर्ट्सला प्रवेश घेतला; मात्र सामाजिक संवेदना जपता याव्यात याकरिता तिने शाळांमध्ये जनजागृती करण्याचे ठरविले. सुरुवातीला स्वत:हून शाळांमध्ये जाऊन दोघी बहिणींनी विद्यार्थ्यांना शाडूच्यामातीचे गणपती बनविण्याचे धडे दिले. आता शाळा स्वत:हून त्यांना बोलावून एकदिवसीय कार्यशाळा घेण्याबाबत आग्रह करतात. स्नेहा आणि श्रद्धा यांनी आतापर्यंत शहरातील कित्येक शाळांमध्ये शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. भविष्यातदेखील ही जनजागृती मोहीम अशीच पुढे चालू ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असा त्यांचा मानस आहे. (प्रतिनिधी)