शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

जोगेश्वरी पॅनल विजयी

By admin | Updated: October 15, 2016 00:18 IST

जोगेश्वरी पॅनल विजयी

वडनेरभैरव : येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व विद्यमान अध्यक्ष संपतराव वक्टे यांच्या जोगेश्वरी पॅनलने सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय संपादित केला आहे.वक्टे यांनी सोसायटीवर तब्बल चौथ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. या निवडणुकीत जिल्हा राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब माळी, पंचायत समिती माजी उपसभापती दिलीप धारराव यांच्या भैरवनाथ पॅनलचा पराभव झाला. वडनेरभैरव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. संपतराव वक्टे यांची गेल्या पंधरा वर्षापासून सोसायटीत सत्ता आहे. यंदा सत्ता बदल होईल या अपेक्षेने विरोधकांनी मोर्चेबांधणी केली होती मात्र वक्टे यांनी जोरदार मुसंडी मारत सर्व जागा जिंकून आणल्या आहेत. या निवडणुकीत जिल्हा तसेच तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या पुढाऱ्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. निवडणुकीत विजयी उमेदवार व कंसात मिळालेली मते - संपतराव वक्टे (७९५), काकासाहेब भालेराव (६२९), विजय निखाडे (६९४), भाऊसाहेब पवार (७१३), कचरू सलादे (६४०), विलास शिंदे (७५१), वामनराव साळुंके (६०७) , राजाराम तिडके (७००), तुकाराम गांगुर्डे (७५७), मीराबाई पाचोरकर (७७४), इंदूबाई तिडके ( ७४८), सुभाष माळी (७२१), भारतसिंग परदेशी (७४६) हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद परदेशी यांनी मतमोजणीनंतर जाहीर केले. निवडणुकीनंतर शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.(वार्ताहर)