सराफा दुकान फोडून दागिने लंपास

By Admin | Updated: September 28, 2014 23:42 IST2014-09-28T23:42:14+5:302014-09-28T23:42:36+5:30

सराफा दुकान फोडून दागिने लंपास

Jewelry Shop Breaks Jewelry Lampas | सराफा दुकान फोडून दागिने लंपास

सराफा दुकान फोडून दागिने लंपास

सुरगाणा : तीन दुकानांतून सुमारे लाखाची चोरीसुरगाणा : येथील मुख्य बाजारपेठेतील सराफी दुकानावरील पत्र उचकटून मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून सोन्याचे दागिने व बेंटेक्सच्या वस्तू असा सुमारे २० हजार रुपयांचा ऐवज लांबविला.
मेनरोडलगत महसूल विभागाच्या चाळीसमोर पत्र्यांचे गाळे असून, यामध्ये दीपक मोहन जाधव यांचे सागर अलंकार हे सराफीचे दुकान आहे. शनिवारी दुकान बंद करून रविवारी सकाळी साडेनऊ वाजता दुकान उघडले असता त्यांना शोकेसची काच फुटलेली, तर छताचे पत्रे वाकवलेले दिसली. जाधव यांनी त्वरित पोलीस ठाण्यात जाऊन चोरी झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी दीपक जाधव यांनी लहान बाळांसाठी लागणाऱ्या तीन ग्रॅमच्या सात अंगठ्या, अडीच ग्रॅमच्या सात नथ व बेंटेकचे नेकलेस व पोत तसेच एक विद्युत ट्यूब नळी असा सुमारे वीस हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. गेल्या दीड महिन्यात सराफी दुकानातून तीन वेळा चोरी झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Jewelry Shop Breaks Jewelry Lampas