शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

जयंत आव्हाड यांचा मनसे सदस्यत्वाचाही राजीनामा

By admin | Updated: July 30, 2014 00:22 IST

राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र : कार्यकर्त्यांची कोंडी

सिन्नर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अडीच वर्षे तालुकाध्यक्ष भूषविलेल्या जयंत आव्हाड यांनी गेल्या महिन्यात अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाच्या धोरणावर व राज ठाकरे यांच्या दुटप्पीपणावर टीकास्त्र सोडत पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.सुमारे अडीच वर्षापूर्वी आव्हाड यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांची सोबत सोडत मनसेत प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून त्यांची उमेदवारी गृहीत धरली जात होती. तथापि, लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारास सिन्नर तालुक्यातून मिळालेली मते पाहिल्यानंतर त्यांनी गेल्या महिन्यात तालुकाध्यक्षपदाचा व आज पक्षाचा सभासदत्वाचा राजीनामा दिला.शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे बोलत नसल्याचे तसेच विकासाची ब्लू प्रिंट आपल्याकडे असल्याची वल्गना करणाऱ्या ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे कधीही ऐकून घेतले नसल्याचे आव्हाड यांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपूर्वीच मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी स्तुतिसुमने उधळणारे राज ठाकरे कधी मोदी यांच्यावर टीका करतात तर कधी आपण मोदी यांच्याविरोधात काहीच बोललो नाही असे म्हणतात. राज ठाकरे यांच्या दुटप्पी धोरणामुळे कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. राज ठाकरे कॉँग्रेस व राष्ट्रवादी विरोधात काहीही बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष म्हणजे कॉँग्रेस पक्षाची बी टीम असल्याची धारणा लोकांमध्ये निर्माण झाल्याचे आव्हाड यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह पक्षाचा राजीनामा देत असल्याचे आव्हाड यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. (वार्ताहर)