शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

‘स्थायी’च्या सभापतिपदासाठी जाधव - गांगुर्डे यांच्यात चुरस

By admin | Updated: March 31, 2017 00:20 IST

नाशिक : सभापतिपदासाठी भाजपात प्रामुख्याने मनसेतून आलेले शशिकांत जाधव आणि कॉँग्रेसमधून आलेले शिवाजी गांगुर्डे यांच्यात चुरस आहे

 नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सभापतिपदासाठी भाजपात प्रामुख्याने मनसेतून आलेले शशिकांत जाधव आणि कॉँग्रेसमधून आलेले शिवाजी गांगुर्डे यांच्यात चुरस आहे. पक्षश्रेष्ठी कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात याकडे आता लक्ष लागून आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सभापतिपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नियुक्ती महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी (दि.३०) विशेष महासभेत घोषित केली. स्थायी समितीवर भाजपा - ९, शिवसेना - ४, कॉँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांचा प्रत्येकी एक सदस्य नियुक्त करण्यात आला आहे. त्यात भाजपाने पंचवटीतील जगदीश पाटील, सुनीता पिंगळे, सातपूरमधून शशिकांत जाधव, पश्चिममधून शिवाजी गांगुर्डे, नाशिकरोडमधून विशाल संगमनेरे, सीमा ताजणे, सिडकोतून अलका अहिरे, मुकेश शहाणे व श्याम बडोदे यांना पहिल्या वर्षी संधी दिली आहे. स्थायीवर नियुक्ती करताना भाजपाने पूर्व विभाग वगळता अन्य सर्व विभागांना प्रतिनिधित्व दिले आहे. स्थायी समितीवर पूर्ण बहुमत असल्याने आता सभापतिपदासाठी शशिकांत जाधव आणि शिवाजी गांगुर्डे यांच्यात चुरस आहे. शशिकांत जाधव हे तीन वेळा महापालिकेवर निवडून आले असून, मागील पंचवार्षिक काळात मनसेतून त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मनसेच्या सत्ताकाळात ते महापौरपदाचे दावेदार होते, परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडली होती. आता भाजपाकडून निवडून गेल्यानंतर त्यांची स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, सभापतिपदासाठी पाच वेळा महापालिकेवर निवडून आलेले शिवाजी गांगुर्डे यांचेही नाव अग्रभागी आहे. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनीही निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. पक्षश्रेष्ठी आता जाधव आणि गांगुर्डे यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात सभापतिपदाची माळ टाकतात, याकडे लक्ष लागून राहणार आहे. (प्रतिनिधी)