राज्य राखीव दलातील जवान जाधव यांचे अपघाती निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:28 IST2020-02-03T00:14:34+5:302020-02-03T00:28:29+5:30
जळगाव खुर्द येथील राज्य राखीव पोलीस दलातील जवान राहुल रवींद्र जाधव (३२) यांचे मुंबईला झालेल्या अपघातात निधन झाले. रविवारी (दि.२) दुपारी जळगाव खुर्दला शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राज्य राखीव दलातील जवान जाधव यांचे अपघाती निधन
नांदगाव : तालुक्यातील जळगाव खुर्द येथील राज्य राखीव पोलीस दलातील जवान राहुल रवींद्र जाधव (३२) यांचे मुंबईला झालेल्या अपघातात निधन झाले. रविवारी (दि.२) दुपारी जळगाव खुर्दला शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने कर्तव्य बजावित असताना मृत्युमुखी पडलेल्या आपल्या दिवंगत सहकाऱ्याला अखेरची मानवंदना देण्यात आली. राहुल मुंबईला गोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या युनिट आठमध्ये हवालदार म्हणून सेवा बजावित होते.
शनिवारी (दि.१) मध्यरात्री जोगेश्वरीहून अंधेरीकडे लोकलने जात असताना त्यांचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. अतिशय मनमिळावू व कर्तबगार म्हणून युनिटमध्ये राहुल हे परिचित होते. सकाळी गाव व परिसरातील नागरिक या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२००९ मध्ये ते महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात रु जू झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. मोठा भाऊ योगेश जाधव भारतीय सैन्यदलात कार्यरत आहे.