जाधव दाम्पत्य आत्महत्या प्रकरणी चौघांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:36 IST2018-06-17T00:36:24+5:302018-06-17T00:36:24+5:30
सावकारी कर्जाला व सावकारांच्या जाचाला कंटाळून पती-पत्नीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्यानंतर अंबड पोलिसांनी या प्रकरणात चार संशयित आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांची १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेतील एक आरोपी फरार असून, त्याच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले आहे.

जाधव दाम्पत्य आत्महत्या प्रकरणी चौघांना कोठडी
सिडको : सावकारी कर्जाला व सावकारांच्या जाचाला कंटाळून पती-पत्नीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्यानंतर अंबड पोलिसांनी या प्रकरणात चार संशयित आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांची १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेतील एक आरोपी फरार असून, त्याच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवलपार्क परिसरातील अष्टविनायकनगर येथील कमल रेसिडेन्सीमध्ये वासुदेव अंबादास जाधव (३८) व संगीता वासुदेव जाधव (३४) यांंनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. लेबर कॉन्ट्रक्टचा व्यवसाय करणारे वासुदेव जाधव यांनी त्यांच्या व्यवसायासाठी पाच सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. परंतु, व्याज रक्कम देऊनही सावकारांकडून वसुलीसाठी त्रास दिला जात असल्याने जाधव दाम्पत्याने सावकारांच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी अशोक केदू होळकर (वय ४७, रा.खुटवडनगर), सुनील पूरकर (वय ३६, रा. अंबड लिंक रोड), राहुल भागवत जाधव (वय २६, रा.गजानननगर) व अमोल मंगेश सोनवणे (वय २८, रा.शुभमपार्क) यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपात अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.