‘गुजरात वंदे’ वाहिनीवरून प्रशिक्षणाविरोधात मनविसेचे महाराष्ट्र गीतावर गरबा खेळून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 15:42 IST2018-09-27T15:36:30+5:302018-09-27T15:42:06+5:30
पहिली व आठवीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील बदलांविषयी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘गुजरात वंदे’ वाहिनी वरून प्रेक्षपण करण्याच्या निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर या मुद्द्यावर नाशिकसह संपूर्ण राज्यात राजकारण पेटले आहे. याच मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने नाशिकमध्ये गुरुवारी (दि.२७) शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर महाराष्ट्र गीतावर गुजराथी वेशभूषेत गरबा खेळून आंदोलन करून सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

‘गुजरात वंदे’ वाहिनीवरून प्रशिक्षणाविरोधात मनविसेचे महाराष्ट्र गीतावर गरबा खेळून आंदोलन
नाशिक : पहिली व आठवीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील बदलांविषयी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘गुजरात वंदे’ वाहिनी वरून प्रेक्षपण करण्याच्या निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर या मुद्द्यावर नाशिकसह संपूर्ण राज्यात राजकारण पेटले आहे. याच मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने नाशिकमध्ये गुरुवारी (दि.२७) शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर महाराष्ट्र गीतावर गुजराथी वेशभूषेत गरबा खेळून आंदोलन करून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. चालु शैक्षणिक वषात सहामाही परीक्षा तोंडावर असताना शिक्षकांना यासंदभार्तील प्रशिक्षण देण्याचा घाट महाराष्ट्र सरकार घालीत असून त्यासाठी शासनाने महाराष्ट्राच्या सह्याद्री वाहनीवर प्रेक्षपणाद्वारे प्रशिक्षण देण्याऐवजी ‘गुजरात वंदे’ वाहिनीवरून प्रेक्षपणाद्वारे प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे. या माध्यमातून राज्य सरकार मराठी द्वेष दाखवीत असून राज्याती भाजपा व शिवसेना युतीचे सरकार स्वत:हून मराठीवर गुजरात व गुजराती भाषेचे आक्रमण घडवून आणत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सनेने केला आहे. महाराष्ट्र व मुंबईला गुजरातमध्ये नेण्याच्या कुटील गुजराती लोकांच्या कटात सरकारमधील मंडळीही सामील असल्याचा गंभीर आरोपही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला असून पक्षाच्या नाशिक शाखेने सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या आवारात शहराध्यक्ष शाम गोहाड यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र गीतावर गुजराती वेशभूषेत गरबा खेळून आंदोलन केले. यावेळी सरकारच्या शैक्षणिक क्षेत्रातील गुजरात धार्जिण्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मनविसेचे नाशिक लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष अतुल धोंगडे, कौशल पाटील,सौरभ सोनवणे,अमर जमधडे,संदीप आहेर,प्रशांत बारगळ, संदेश अडसुरे,प्रसाद घुमरे,सुयश पागेरे,नितीन धानापुणे,मंगेश रोहम,अतिष भोसले,रोशन आडके,गणेश लोहरे, स्वप्नील कातोरे,अविनाश खर्जुल,जयेश शिंदे,शरद ढमाले,गणेश झोमान,विशाल चौधरी आदींनी कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.