शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाची महिला आयोगाकडून चौकशी

By admin | Updated: April 10, 2017 01:59 IST

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नसल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़

 नाशिक : जिल्हा रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही़ तसेच सरकारी सेवेत असतानाही खासगी रुग्णालय थाटून शासनाची व रुग्णांची फसवणूक करणाऱ्या राज्यभरातील डॉक्टरांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़ अवैध गर्भपात प्रकरणानंतर रहाटकर यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देऊन संपूर्ण घटनेची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांच्याकडून माहिती जाणून घेतली़रहाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी शासनस्तराव प्रयत्न सुरू असून, कायदेही तयार करण्यात आले आहेत़ मात्र कायद्यातील पळवाटा शोधून जिल्हा रुग्णालयातच असे प्रकार होत असतील तर ही गंभीर बाब आहे़ मुंबई नर्सिंग अ‍ॅक्टच्या रजिस्टरमध्येही डॉ़ वर्षा लहाडे यांनी फेरफार केल्याचे समोर येत आहे़ तसेच शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी पथकांनी डॉ. लहाडे यांच्या खासगी हॉस्पिटलची तपासणी केली असता त्यामध्ये संशयास्पद कागदपत्रेही आढळून आली आहेत. मुळात अशाप्रकारे खासगी रुग्णालयात सेवा देणे हा कायद्याचा भंग आहे. नाशिक महापालिकेकडे मार्चमध्ये आलेल्या निनावी तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आले़ कागदपत्रांमध्ये फेरफार तसेच वर्तणूक चांगली नसल्याने त्यांची पदवी रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे पाठविला आहे़ सरकारी सेवेत असूनही खासगी सेवा देणाऱ्या डॉ़ लहाडेंबाबत जिल्हा रुग्णालयातील कोणालाच माहिती नाही याबाबत रहाटकर यांनी आश्चर्य व्यक्त केले़ या प्रकरणाची सखोल तपासणी करून लहाडे यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे़ तसेच राज्यात अशा प्रकारचे वैद्यकीय क्षेत्रात गुन्हे करणाऱ्या व रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांची गय केली जाणार नाही, असेही विजया रहाटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.या प्रकरणाची आरोग्य विभागाकडून सखोल चौकशी सुरू असून, अहवाल प्राप्त होताच फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही रहाटकर यांनी सांगितले. यावेळी महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, भाजप गटनेते संभाजी मोरूस्कर, नगरसेवक उद्धव निमसे आदिंसह भाजपा महिला पदाधिकारी तसेच विविध आघाडींच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)