शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट बँकिंगचा वापर वाढला

By admin | Updated: November 14, 2016 02:05 IST

ई-प्रणाली आत्मसात करण्याकडे कल

नाशिक : गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपये चलनातून बाद केल्यानंतर देशासह शहरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आपल्या जवळ असणारे पैसे खात्यात जमा करण्यासाठी तसेच दैनंदिन वापरासाठी पैसे जवळ बाळगण्यासाठी नागरिकांनी शहरातील विविध बँकांबाहेर गर्दी केल्याचे चित्र आहे.बँकेत आपल्या जवळील पैसे नवीन चलानाप्रमाणे बदलून मिळत असले तरी सुट्या पैशांअभावी मात्र नागरिकांची कुचंबणा होत आहे. ऐन वेतन मिळण्याच्या दिवसातच हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने कामगार वर्गामध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. किराणा दुकानदार, दूधवाला तसेच इतर दैनंदिन खर्चासाठी पैसे काढण्यासाठी नागरिकांनी एटीएम केंद्र तसेच बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक मोबाइलचे रिचार्ज, वीज बिलाचा भरणा, टीव्हीचे रिचार्ज, टेलिफोन बिल भरण्यासाठी नागरिकांची मोठी कसरत होत असतानाच अनेक ग्राहकांनी सुट्या पैशांअभावी इंटरनेटद्वारे भरणा करण्यास प्राधान्य दिले तर काही नागरिकांना मात्र यानिमित्ताने इंटरनेट बँकिंग किती आवश्यक आहे, हे अधोरेखित झाले.बाजारपेठेत सुटे पैसेच उपलब्ध होत नसल्याने अनेक दुकानदारही सुटे पैसे देण्यासाठी असमर्थ ठरत आहेत. या जाचाला कंटाळून अनेक मोबाइल ग्राहकांनी इंटरनेट बँकिंगद्वारे तसेच डेबिट कार्ड - के्रडीट कार्डचा वापर करून रखडलेले मोबाइल बिल भरले तसेच आपले मोबाइल रिचार्ज केले. वीज बिल भरणा किंवा मोबाइल बिल भरणाप्रमाणे अनेक पेट्रोलपंपांवरही डेबिट किंवा क्रेडीट कार्ड स्वॅप करून पेट्रोल भरणा करण्यात येत होता. शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदी करण्यासाठी आलेला ग्राहक वर्गालादेखील सुट्या पैशांच्या अभूतपूर्व चणचणीमुळे ज्या दुकानांमध्ये बँकेचे कार्ड व्यवहारासाठी स्वीकारले जात होते अशा दुकानांमध्ये खरेदी करावी लागत होती. ई-व्यवहाराचे महत्त्व अधोरेखित होऊ लागले आहे आणि यामुळेच भविष्यात ‘कॅश लेस’ व्यवहार करणेदेखील सोयीचे होणार आहे. (प्रतिनिधी)