पिकांवर किड्यांचं आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 10:56 PM2020-09-04T22:56:39+5:302020-09-05T01:07:32+5:30

निफाड तालुक्यातील टमाटे, कोबी, फ्लॉवर, वांगे, सोयाबीन, मका पिकांवर किडींनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे.

Insect attack on crops | पिकांवर किड्यांचं आक्रमण

पिकांवर किड्यांचं आक्रमण

Next
ठळक मुद्दे बळीराजा हवालदिल : चार चार फवारण्या करूनही होईना फायदा

सायखेडा : निफाड तालुक्यातील टमाटे, कोबी, फ्लॉवर, वांगे, सोयाबीन, मका पिकांवर किडींनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे.
उपाय म्हणून शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतात. मात्र या कीटकनाशकांनी किडीच्या अळी, मावा, तुडतुडे मोठ्या प्रमाणावर आले आहे. चार चार फवारण्या करूनही कीड नियंत्रणात येत नसल्याने शेतकऱ्यांनी औषधांचे प्रमाण वाढवून फवारणी सुरू केली आहे. त्यातच एकाच वेळी दोन ते तीन औषधांचा वापर केल्यानेही कीटकनाशक अत्यंत उग्र स्वरूपाचे तयार होते. त्यामुळे विषारी औषधातील घटक श्वसनावाटे फवारणी करणाºयाच्या फुप्फुसात जाऊन शेतकरी आजाराने बेजार होतात, तर काहींचे दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
शेतकरी आतापर्यंत देशी पंपाच्या साहाय्याने कीटकनाशक फवारणी करायचे. पण आता त्यांना भुरळ पडली चायना बनावटीच्या फवारणी यंत्राची. या यंत्रामुळे फवारणी दहापटीने जलद होते. पण आधीच विषारी औषधाचं प्रमाण जास्त झालेलं असताना चायना फवारणी यंत्राने हे विषारी घटक दहापट जास्त जलद गतीने हवेत मिसळण्यास मदत केली जाते. याशिवाय पिकावर कीड पडत नाही असा दावा केला जात असताना कीड पडून कीटकनाशक फवारणी करण्याची वेळ आलीच कशी, असाही एक प्रश्न पडत आहे. शेतकऱ्यांना औषधी फवारण्याचे प्रशिक्षण घेणे गरजेचे असल्याचे मत शेतकºयांकडून व्यक्त केले जात आहे.
मिश्रण तयार करताना हातमोजे घालणे आणि तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. सोबतच फवारणी करताना अंग झाकलेलं असणं गरजेचं असतं. यामध्ये हात आणि पायात मोजे, तोंडाला मास्क, डोक्यावर कापड आणि अंगभर कपडे घालणं गरजेचं आहे. वाºयाच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये, फवारणी झाल्यानंतर काही काळ शेतात जाणं टाळावं, फवारणी करताना वापरलेले कपडे किंवा वस्तू इतर कामांसाठी वापरू नये. विषबाधेचे लक्षणं दिसून आल्यास त्वरित काही प्राथमिक उपाय करावे, असे आवाहन कृषी अभ्यासक शांताराम कमानकर यांनी केली आहे.

कीटकनाशके फवारणी करताना वारा शांत असताना करावी. लेबलवरील माहिती काळजीपूर्वक वाचून अनुकरण करावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हातमोजे, फुलपॅन्ट व शर्ट तसेच पायात गम बूट, नाक व तोंडावर मास्क, डोक्यावर टोपी, डोळ्यावर चष्मा इत्यादीचा वापर करावा. - बी. टी. पाटील, कृषी अधिकारी, निफाड

Web Title: Insect attack on crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.