शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी : दळवट येथील विद्यार्थी आत्महत्त्या प्रकरण

By admin | Updated: January 2, 2015 00:25 IST

मुख्याध्यापकासह अधीक्षक ताब्यात

पाळे खुर्द / कनाशी : तालुक्यातील दळवट येथील विद्यार्थी आत्महत्त्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून, मयत विद्यार्थ्याच्या नातेवाइकांची पोलीस, महसूल व आदिवासी विकास खात्याच्या अधिकारी व शिक्षकांशी दिवसभर वाद झाल्याने आश्रमशाळेला छावणीचे स्वरूप आले होते. या प्रकरणाची माहिती घेत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मध्यस्थी करीत या वादावर पडदा टाकत या प्रकरणाची कसून व निपक्षपातीपणे चौकशी व्हावी, अशी भूमिकाही स्पष्ट केली.कळवण तालुक्यात दळवट येथे आदिवासी विकास विभागाची पहिली ते बारावीपर्यंत शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळा आहे. ह्या आश्रमशाळेत शिवभांडणे येथील योगेश मधुकर बागुल हा विज्ञान शाखेत बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्त्या केली. आपल्या शाळेतील विद्यार्थ्याने गळफास घेतला आहे हे समजूनही शाळेतील शिक्षकांनी शाळा सुरू ठेवली तर शालेय व्यवस्थापन समितीही शाळेकडे फिरकलीच नाही. त्यामुळे हा घातपातच असल्याचा सूर पालकांनी लावला. याबाबत कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही काम करू शकतो, असे प्रभारी प्रांताधिकारी संजय बागडे, पोलीस उपअधीक्षक सचिन गुंजाळ, तहसीलदार अनिल पुरे, प्रकल्प अधिकारी अविनाश चव्हाण आदिंनी संबंधिताना सांगितले. मात्र मयताचे नातेवाईक ऐकून घेण्यास तयार होत नव्हते. यामध्येच पोलिसांशी त्यांची झटापट झाल्याने वातावरण चिघळले. घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली. दरम्यान, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी या ठिकाणी हजेरी लावत संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत समन्वय साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांच्या समवेत आदिवासी नेते एन.डी. गावित, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ, काशीनाथ गायकवाड आदि उपस्थित होते. दरम्यान, आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकाणी अभोणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चौकशीसाठी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक डी. एन. निकम, अधीक्षक मंगेश खिराडकर यांना ताब्यात घेण्यात आले असून, मुख्याध्यापक सध्या दवाखान्यात दाखल आहेत. (वार्ताहर)