बदलत्या वातावरणाच्या संशोधनाची माहिती प्रदर्शनात यावी
By Admin | Updated: November 19, 2014 01:15 IST2014-11-19T01:15:25+5:302014-11-19T01:15:25+5:30
बदलत्या वातावरणाच्या संशोधनाची माहिती प्रदर्शनात यावी

बदलत्या वातावरणाच्या संशोधनाची माहिती प्रदर्शनात यावी
नाशिक : शेतीला सर्वाधिक फटका हा वातावरण बदलाचा बसतो आहे़ अचानक येणारा पाऊस, गारपीट यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत असून, बदलत्या वातावरणाची पूर्वसूचना देणारे तंत्रज्ञान प्रदर्शनातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे, असे मत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी येथे व्यक्त केले़ 'ुमन सर्र्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स यांच्या वतीने ठक्कर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कृषिथॉन कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते़ गेले पाच दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनाचा आज समारोप झाला़ यावेळी चव्हाण व उपस्थितांच्या हस्ते उत्कृष्ट सजावटीचा स्टॉल हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महिंद्र अॅण्ड महिंद्रने पटकावला़ तसेच इतर स्टॉलधारकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़ पाऊस सुरू असतानाही जिल्'ासह राज्यभरातून तसेच इतर राज्यांतील अशा सुमारे तीन लाख शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट दिली व प्रदर्शनात सुमारे ५० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला़ याप्रसंगी आत्मा प्रकल्पाचे सागर खैरनार, औरंगाबाद राष्ट्रवादी कॉँगे्रसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, आयोजक संजय न्याहारकर, विजय पाटील, साहिल न्याहारकर, भगवान खैरनार, संजय सोनवणे आदि उपस्थित होते़ अखेरच्या सत्रात आज यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कृषी विभागप्रमुख रावसाहेब पाटील यांनी कृषी क्षमता व पोषणमूल्य यावर मार्गदर्शन केले़ तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांना कृषी विज्ञान केंद्राचे हेमराज राजपूत यांनी उत्तरे दिली़ नांदेड येथील व्यंकटेश जोशी व शिवाजी केश्वटवार यांनी सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले़