शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

भाताच्या लागवडीवर महागाईचे सावट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:14 IST

भात पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा तालुका म्हणून इगतपुरी तालुक्याची संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात एक वेगळी ओळख आहे. धरणांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी ...

भात पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा तालुका म्हणून इगतपुरी तालुक्याची संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात एक वेगळी ओळख आहे. धरणांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात पिकाबरोबर बागायती पिके घेण्याकडे लक्ष केंद्रित केले असले तरी पावसाळ्यात पारंपरिक भात पिके घेण्यासाठी शेतकरी सज्ज असतो. पारंपरिक भाताच्या बियाणाला बगल देऊन नवनवीन व संकरित बियाणांची लागवड करून कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यावरही अधिक भर आहे. देशात इंधनाच्या दारात भरमसाठ वाढ होत असल्याने या इंधन दरवाढीचा फटका आता शेतकऱ्यांनाही बसत आहे.

इन्फो...

पशुधन घटल्याचा परिणाम

तालुक्यातील पशुधनात लक्षणीय घट झाल्याने शेतीच्या मशागतीसह पेरणीसाठी तालुक्यातील शेतकरी यंत्र व ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहे. डिझेलच्या दरातही वाढ झाल्याने पूर्वी ५०० ते ६०० रुपये प्रतितासी भाड्याने मिळणारा ट्रॅक्टर आता कोरड्या मशागतीसाठी ७०० तर गाळासाठी ८०० ते ८५० रुपये प्रतितास या दराने मिळत आहे. याबरोबर पशुधन घटल्याने बैलाचे औत रोजावर मजुरीने मिळणे दुर्मीळ झाले असून, दोन वर्षांपूर्वी १५० रुपये रोजाने मिळणारे औत ५०० रुपये प्रतिदिवसाची मजुरी देऊनही मिळत नाही.

संकरित बियाणांकडे वाढला कल

गेल्या तीन ते चार वर्षांपासून कमी वेळेत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बाजारात नवनवीन दाखल होणाऱ्या संकरित बियाणांच्या लागवडीला प्राधान्य दिल्याने, या संकरित बियाणांच्या उत्पन्नात भाताची भेसळ अधिक प्रमाणात येत असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी सुधारित बियाणे खरेदी करावे लागत आहे. बियाणांच्या किमतीतही दरवर्षी भरमसाठ वाढ होत असते.

इरलेही झाले महाग

भात पिकाच्या लागवडीच्या वेळी शेतकऱ्यांच्या पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी लागणाऱ्या पानघोंगडे (इरले) तसेच लोकरीपासून तयार होणारी घोंगडी यांच्याही किंमतीत यावर्षी भरमसाठ वाढ झाली आहे. बांबूच्या लाकडापासून तयार होणारा पानघोंगड्यांचा साठा पूर्वी ६० ते ७० रुपयांना मिळत होता. हाच साठा आता १५० ते २०० रुपयांना मिळत आहे, तर घोंगड्यांच्या किमतीत यावर्षी दुप्पट वाढ झाली आहे.

हाती काही नाही लागत

महागडी बियाणे, खते, औजारे व साहित्य खरेदी करून महागाईला तोंड देऊन पेरणी केलेली शेतातून उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण करावे लागते. भाताची पेरणी, लागवड, निंदणी, कापणी यासाठी भरमसाठ मजुरी द्यावी लागते. परिणामी यातून शेतकऱ्यांच्या हाती मात्र काहीच लागत नसल्याच्या अनुभव दरवर्षी शेतकऱ्यांना येत असतो.

छायाचित्र - २७ नांदूर१

इगतपुरी तालुक्यात भात लागवड करताना शेतकरी.

270721\27nsk_21_27072021_13.jpg

 इगतपुरी तालुक्यात भात लागवड करतांना शेतकरी.