भंगार बाजारात चाचपणी : कुख्यात गुंड विकास दुबेचे नाशिकमध्ये लागेबांधे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 01:33 PM2020-07-08T13:33:26+5:302020-07-08T13:53:43+5:30

उत्तरप्रदेशमध्ये कुख्यात सराईत गुंड दुबे याने टोळीसह कानपुरमध्ये २ जुलै रोजी अपर पोलीस अधिक्षकासह पोलिसांचे हत्त्याकांड घडवून आणले होते. यानंतर उत्तरप्रदेश राज्याची पोलीस यंत्रणा दुबेच्या मागावर आहे.

Infamous goon Vikas Dubey's involvement in Nashik? | भंगार बाजारात चाचपणी : कुख्यात गुंड विकास दुबेचे नाशिकमध्ये लागेबांधे?

भंगार बाजारात चाचपणी : कुख्यात गुंड विकास दुबेचे नाशिकमध्ये लागेबांधे?

Next
ठळक मुद्दे१०० पैकी दोन पथके नाशिक व औरंगाबादमध्ये दाखलफरार गुंड विकासवर अडीच लाखांचे बक्षीस  १०० पोलिस पथके मागावर

नाशिक : उत्तरप्रदेश राज्यातील कुख्यात गुंड विकास दुबे याचे नाशिकमध्ये लागेबांधे असल्याची चर्चा आहे. त्याच्या मागावर उत्तरप्रदेशच्या विविध जिल्ह्यांमधील पोलिसांची १०० पथके असून त्यापैकी दोन पथके राज्यातील नाशिक व औरंगाबादमध्ये दाखल झाली असल्याची जोरदार चर्चा आहे. नाशकातील सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील भंगार बाजारात एका पथकाने झडतीसत्रदेखील राबविल्याचे वृत्त आहे; मात्र नाशिक शहर पोलीस दलाने याबाबत कुठलीही माहिती नसल्याचा खुलासा केला आहे. यामुळे नाशिक पोलिसांना उत्तरप्रदेशच्या पथकाकडून अनभिज्ञ ठेवले गेले की काय? अशीही चर्चा होत आहे.
उत्तरप्रदेशमध्ये कुख्यात सराईत गुंड दुबे याने टोळीसह कानपुरमध्ये २ जुलै रोजी अपर पोलीस अधिक्षकासह पोलिसांचे हत्त्याकांड घडवून आणले होते. यानंतर उत्तरप्रदेश राज्याची पोलीस यंत्रणा दुबेच्या मागावर आहे. दुबे हा हरियाणासह मध्यप्रदेश, महाराष्टÑातदेखील आश्रय घेण्याची शक्यता लक्षात घेता विविध पथकांकडून सर्वत्र सापळे रचण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, दुबेचे धागेदोेरे थेट नाशिकपर्यंत येऊन लागले की काय? अशी शंकाही उपस्थित होत आहे. उत्तरप्रदेशच्या तपासी पथकाने नाशिकमध्ये येऊन सातपूर परिसरातील संशयित भागांमध्ये थेट ‘कोम्बींग’ही राबविले; मात्र नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षापासून तर थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कोणीही याबाबत काहीही माहिती स्पष्टपणे सांगितली नाही. त्यामुळे नाशिक पोलिसांना विश्वासात न घेताच उत्तरप्रदेशच्या तपासी पथकाकडून दुबेचे नाशिकमधील धागेदोरे तपासले जात आहे की काय? असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे. गुंड विकास व त्याच्या टोळीचा शोध उत्तरप्रदेशसह पाच राज्यांमध्ये पथकांकडून घेतला जात आहे.
नाशकात कुख्यात गुंड अवैध शस्त्रे विकल्याचा तसेच सशस्त्र सुरक्षारक्षक देण्याचा ठेका असल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी नाशिकसह औरंगाबाद येथे विशेष झडती सत्र राबविल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडून समजली आहे. मात्र त्यास शहर पोलिसांकडून अद्यापही कुठल्याहीप्रकारे दुजोरा मिळू शकलेला नाही. याउलट या संवेदनशील प्रकरणामध्ये सहकार्य करण्याचे आवाहन माध्यमांना शहर पोलीसांकडून करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये औद्योगिक क्षेत्रांत कामगारांचा पुरवठा?
नाशिक पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये कामगार पुरविण्यापासून ते बंदुकधारी सुरक्षा रक्षक पुरविण्याचा ठेका गुंड विकासच्या नावावर असल्याची माहितीही समोर येत आहे. सातपूर अंबड लिंक रोडवरील भंगार व्यवसायातही त्याची भागीदारी व ठेकेदारी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुबे व त्याची फरार टोळी आता उत्तरप्रदेश पोलिसांच्या रडारवर आहे. उत्तर प्रदेशच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. दुबेच्या मागावर असलेले उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष पथक नाशिकमध्ये अल्याबाबतची कारवाई दुबेच्या मुसक्या आवळण्यासाठी गोपनीय ठेवली जात असल्याचेही बोलले जात आहे.

 १०० पोलिस पथके मागावर
आठ पालिसांच्या हत्याकांडानंतर फरार दुबेला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांसह इतर राज्यांमध्ये छापे टाकले जात आहेत. उत्तरप्रदेश पोलिसांकडून फरार गुंड विकासवर अडीच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी ३ हजार पोलिसांचा समावेश असलेली १००पथके रवाना झाली असून त्यातील २ पथके नाशिक व औरंगाबादमध्ये दाखल झाली आहेत.

दुबे प्रकरणाबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. त्यासंबंधी माहितीची नाशिक पोलिसांकडून खातरजमा केली जात आहे. ही बाब अत्यंत संवेदनशील असल्याने याबाबत खात्री करून माध्यमांनी पोलिसांना सहकार्य करावे.
-लक्ष्मीकांत पाटील, उपायुक्त, गुन्हे शाखा, नाशिक

Web Title: Infamous goon Vikas Dubey's involvement in Nashik?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.