शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील उद्योजक रडारवर

By admin | Updated: December 31, 2016 23:31 IST

आयकर विभाग : व्यावसायिकांसह ४० जणांना नोटिसा

नाशिक : त्र्यंबकेश्वरमधील पुरोहितांनंतर आयकर विभागाने नाशिकचे उद्योजक व व्यावसायिकांची तपासणी सुरू केली आहे़ पंतप्रधानांच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर बँक खात्यात एक कोटी रुपयांहून अधिक नोटांचा भरणा करणाऱ्या शहरातील १२५ जणांची यादी तयार करण्यात आली असून, त्यापैकी ४० जणांना नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे़ विशेष म्हणजे यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश असून, आयकर विभागाच्या या धडक कारवाईमुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे़
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणेस पन्नास दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे़ या कालावधीत बँक खात्यांमध्ये एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम भरणारे आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत़ नोटिसा बजावण्यात आलेल्या ४० जणांनी सुमारे ५ ते ७ कोटी रुपये बँकांमध्ये भरल्याचे वृत्त असून, या रकमेचा स्त्रोत आयकर विभागाने मागविला आहे़ या रकमेचा स्त्रोत देण्यास संबंधित नोटीसधारक अयशस्वी ठरल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे़
आयकर विभागाने नोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये शहरातील बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, पुरोहित, उद्योजक तसेच काही राजकारण्यांचाही यामध्ये समावेश आहे़ नोटाबंदीच्या कालावधीत अनेक बँकांनी या मोठ्या वर्गाला सहकार्य करून त्यांच्या मोठ मोठ्या रकमा भरून घेतल्या आहेत़ बँकांमध्ये जुन्या नोटा जमा करण्याची मुदत संपल्याने बँक खात्यांमध्ये किती रक्कम जमा झाली याचा तपशील आता आयकर विभागाकडे प्राप्त होऊ लागला असून, त्यांनी आपले लक्ष्य या मोठ्या वर्गावर केंद्रित केले आहे़
नाशिक शहरातील १२५ जणांची प्रथम यादी आयकर विभागाने तयार केली असून, त्यामध्ये १ कोटीहून अधिक रक्कम बँकेत भरणाऱ्यांचा समावेश असून, त्यापैकी प्रथम ४० जणांना नोटीसा पाठविल्या आहेत़ नोटिसा मिळालेल्यांमध्ये शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाचे नाव आघाडीवर असून, त्याने सुमारे सात कोटी रुपये आपल्या बँक खात्यावर भरल्याचे वृत्त आहे़ आयकर विभागाने या व्यावसायिकाकडून उत्पन्नाचे स्त्रोत मागविले असून, यामध्ये दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)