इंदिरानगरला भरधाव वाहनाच्या धडकेत महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 16:50 IST2018-11-19T16:49:28+5:302018-11-19T16:50:46+5:30
नाशिक : भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत इंदिरानगरमधील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील कलानगर चौकालगत रविवारी (दि़१८) सकाळच्या सुमारास घडली़ कमल पांडुरंग भाग्यवंत (५२, रा. सावित्रीबाई फुलेनगर म्हाडा कॉलनी वडाळागाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे़

इंदिरानगरला भरधाव वाहनाच्या धडकेत महिला ठार
नाशिक : भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत इंदिरानगरमधील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील कलानगर चौकालगत रविवारी (दि़१८) सकाळच्या सुमारास घडली़ कमल पांडुरंग भाग्यवंत (५२, रा. सावित्रीबाई फुलेनगर म्हाडा कॉलनी वडाळागाव) असे अपघातातमृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे़
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास कमल भाग्यवंत या राजीवनगर वसाहतीतील किराणा दुकान उघडण्यासाठी जात होत्या़ कलानगर चौकातून पायी जात असताना भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली़ यामध्ये गंभीर जखमी झाल्याने मुलगा नीलेश भाग्यवंत याने प्रथम खासगी व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़