शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यातील अपक्ष सदस्य राष्ट्रवादीत

By admin | Updated: March 2, 2017 01:19 IST

सटाणा : अपक्ष उमेदवार गणेश अहिरे हे राष्ट्रवादीसोबत गेल्याने आदिवासी नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यातील पठावेदिगर गटात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करून निवडून आलेले अपक्ष उमेदवार गणेश अहिरे हे राष्ट्रवादीसोबत गेल्याने आदिवासी नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘चीत भी मेरी, पट मेरी’ ही उक्ती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वापरल्याने अपक्ष गणेश अहिरे यांनी पराभूत केलेले राष्ट्रवादीचे उमेदवार संजय सोनवणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीला धडा शिकविण्यासाठी भाजपाचा मार्ग आपल्यासाठी खुला असल्याचे सांगून लवकरच त्याबाबत आपण निर्णय जाहीर करणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. सोनवणे यांच्या भूमिकेमुळे आदिवासी भागात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.बागलाण तालुक्यातील पठावेदिगर गटात तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आदिवासी पश्चिम पट्ट्यातील आदिवासी नेत्यांनी एकत्र मोट बांधून उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार माजी आमदार लहानू बाळा अहिरे यांचे पुत्र गणेश यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार संजय सोनवणे यांचा साडेतीन हजार मतांनी पराभव केला. निवडून येताच गणेश अहिरे अक्षरश: गायब झाले. नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाच्या एका माजी मंत्र्याच्या इशाऱ्यामुळे आणि जिल्हा परिषदेच्या एका माजी सभापतीच्या मध्यस्थीनंतर अहिरे यांना पक्षाच्या ताब्यात दिल्याचे बोलले जात असून, एका शिक्षण संस्थेत नोकरीला असलेल्या अहिरे यांना राजकीय दबावालादेखील बळी पडावे लागले. आदिवासींच्या जिवावर निवडून आलेले अहिरे यांनी स्थानिक आदिवासी नेत्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतल्याने आदिवासी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.(वार्ताहर)