सावरगाव विद्यालयात स्वातंत्र्य दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:19 IST2021-08-18T04:19:18+5:302021-08-18T04:19:18+5:30

येवला : शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम. जी. पाटील उच्च माध्यमिक ...

Independence Day at Savargaon Vidyalaya | सावरगाव विद्यालयात स्वातंत्र्य दिन

सावरगाव विद्यालयात स्वातंत्र्य दिन

येवला : शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम. जी. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात पवार तसेच संस्थेचे सचिव प्रमोद पाटील, सहसचिव प्रवीण पाटील यांनी मनाेगत व्यक्त केले. सेवानिवृत्त पर्यवेक्षक एस. आर. पैठणकर, शेतकरी बबन काटे, मोतीराम राजवाडे, पर्यवेक्षक व्ही. एन. दराडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

प्रारंभी ध्वजपूजन व प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यालयात यावर्षी दहावी व बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा पवार यांच्या हस्ते रोख बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. प्राचार्य शरद ढोमसे यांनी विद्यार्थीहितासाठी राबविल्या जाणार्‍या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन व्ही. एस. विंचू यांनी केले. भाग्यश्री सोनवणे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक गजानन नागरे, पोपट भाटे, उमाकांत आहेर, यशवंत दराडे, नामदेव पवार, योगेश भालेराव, संतोष विंचू, रवींद्र दाभाडे, संजय बहिरम, प्रमोद दाणे, उज्वला आहेर, लक्ष्मण माळी, सगुना काळे, योगेश पवार, विकास व्यापारे, मयुरेश पैठणकर, रोहित गरूड, सुनील चौधरी,अरुण नागरे, मच्छिंद्र बोडके, लक्ष्मण सांगळे आदी उपस्थित होते.

(१६ येवला सावरगाव)

160821\140316nsk_85_16082021_13.jpg

सावरगाव, भारम विद्यालयात स्वातंत्र्य दिन

Web Title: Independence Day at Savargaon Vidyalaya