पारेगाव येथे स्वातंत्र्यदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:19 IST2021-08-18T04:19:22+5:302021-08-18T04:19:22+5:30

येवला : तालुक्यातील पारेगाव येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यालय येथे सैन्य दलातील योगेश गवळी यांचे वडील रमेश माळी व ...

Independence Day at Paregaon | पारेगाव येथे स्वातंत्र्यदिन

पारेगाव येथे स्वातंत्र्यदिन

येवला : तालुक्यातील पारेगाव येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यालय येथे सैन्य दलातील योगेश गवळी यांचे वडील रमेश माळी व आई सिंधूबाई गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सचिन आहेर, उपसरपंच वैशाली जाधव, ग्रामपंचायत सदस्य वैशाली कुमावत, वंदना माळी, जयश्री पवार, तारा शिंदे, वैभव खिल्लारे, नामदेव घोलप, पंकज सोनवणे, ग्रामसेवक विलास कवडे, पोलीस पाटील हरीश गांगुर्डे, गणेश पाठे, नंदू जाधव, शिवाजी भोसले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

पारेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर सय्यद, सरपंच सचिन आहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचलन मुख्याध्यापक पुंडलिक पवार यांनी केले. कार्यक्रमास उपसरपंच वैशाली जाधव, हेमलता खैरनार, मनीषा मारवाडी, मेनका गोर्डे, मनीषा पाटे, अर्चना जेजुरकर, आशा पाटे, सुनीता वाळके, सविता काळे आदी उपस्थित होते.

Web Title: Independence Day at Paregaon