अध्यक्षस्थानी भारतीय सैन्य दलातील जवान सिद्धार्थ अहिरे होते. सैन्य दलातील रायफलमॅन विलास दत्तू शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच विविध कार्यकारी सोसायटी वडेल व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, वडेल यांच्या संयुक्त विद्यमाने महादू विलचंद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रगतिशील शेतकरी मुरलीधर सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वडेल ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच विद्यालयाचे प्राचार्य एस. के. शिरोळे, पर्यवेक्षक बी.डी. सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडाशिक्षक एम.आर. सोनवणे व एच.एस. देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले. प्रास्ताविक के.बी. आहिरे यांनी केले तर आभारप्रदर्शन वीरेंद्र निकम यांनी केले.
फोटो- १६ केबीएच स्कूल
केबीएच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच ग्रामपंचायत वडेल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी व महाविद्यालयातील शिक्षकवृंद.
160821\16nsk_84_16082021_13.jpg
फोटो- १६ केबीएच स्कूलके.बी.एच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच ग्रामपंचायत वडेल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी व महाविद्यालयातील शिक्षकवृंद.