शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात एक हजारांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 11:24 PM

नाशिक : महापालिकेच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असून, तसा प्रस्ताव प्रशासनाने महासभेवर सादर केला आहे. त्याचप्रमाणे कोविड काळात घर सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनादेखील वैद्यकीय कवच देण्यात येणार असून, कार्योत्तर मंजुरीचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देयेत्या १९ मे रोजी ऑनलाईन महासभा होणार

नाशिक : महापालिकेच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असून, तसा प्रस्ताव प्रशासनाने महासभेवर सादर केला आहे. त्याचप्रमाणे कोविड काळात घर सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनादेखील वैद्यकीय कवच देण्यात येणार असून, कार्योत्तर मंजुरीचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला आहे.नाशिक महापालिकेची मासिक महासभा येत्या १९ मे रोजी ऑनलाईन महासभा होणार असून, त्यात हा विषय प्रशासनाने मांडला आहे. महापालिकेत सहा मुख्य सेविका, ३४२ तसेच ३४० मदतनीस आहेत. यातील मुख्य सेविकांना प्रत्येकी ५ हजार ५००, सेविकांना ४६२० रुपये आणि मदतनिसांना ४४०० असे मानधन आहे. या अल्प वेतनातदेखील या सेविका केवळ अंगणवाडीचेच काम नाही, तर महापालिकेचे अनेक प्रकारची सर्वेक्षणे करतात. कोरोना काळात तर घर सर्वेक्षण करून नागरिकांच्या प्राथमिक आरोग्य तपासणीचे कामदेखील त्यांना देण्यात आले होेते. आता या सेविकांना मानधनात वाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला आहे. प्रत्येकी एक हजार रुपये अशी त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे. या सेविका आणि मदतनिसांच्या मानधनात वाढ केल्याने मासिक ३७ लाख ९७ हजार रुपये इतका खर्च होणार आहे.दरम्यान, कोरोना काळात काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच अंगणवाडी सेविकांचादेखील वैद्यकीय विमा काढण्यात आला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचा दोन लाख रुपयांचा वैद्यकीय विमा काढण्यात आला आहे. त्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद होती; परंतु अंगणवाडी सेविकांनादेखील योजनेत समाविष्ट केल्याने एकूण प्रीमियमचा खर्च ५० लाख रुपये होणार आहे. त्यामुळे कार्योत्तर मंजुरीसाठी हा प्रस्ताव महासभेत सादर करण्यात आला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदanganewadi jatraआंगणेवाडी