शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीअभावी गैरसोय

By admin | Updated: February 1, 2016 22:48 IST

ठाणगाव : ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे आयोजित ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक ठराव मंजूर करण्यात आले.सरपंच नामदेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मारुती मंदिरात झालेल्या ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी बी.एस. भोसले यांनी १४ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या १५ लाख ३० हजार रुपयांच्या निधीतून करावयाच्या कामांचा आढावा घेतला. घरपट्टी आकारणीच्या नवीन नियमांविषयी यावेळी माहिती देण्यात आली. ग्रामपंचायतीने सांडपाण्याचे नियोजन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. घरासमोर पथदीप नाही व परिसरात साफसफाई होत नाही, त्यामुळे याबाबतचा कर आकारण्यात येऊ नये, अशी मागणी संजय शिंदे यांनी केली. ग्रामसभेस अनुपस्थित असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. १४ व्या वित्त आयोगातील निधीतून दलीत वस्तीत विकास कामे करण्याची मागणी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याप्रसंगी तलाठी वाय. आर. गावित, आण्णासाहेब काकड, अरुण केदार, किरण बोऱ्हाडे, नामदेव फोडसे, पोपट शिंदे, उत्तम शिंदे, दिनेश भोर, अशोक गायकवाड, तानाजी शिंदे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)