साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 20:35 IST2025-04-18T20:15:54+5:302025-04-18T20:35:52+5:30

नाशिकमध्ये लग्नाआधीच होणाऱ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून आयकर अधिकाऱ्याने स्वतःला संपवले.

Income Tax officer end his life after being fed up with his wife harassment even before marriage. | साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!

साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!

Nashik Crime: गेल्या काही दिवसांपासून देशभरात अनैतिक संबंधातून घडणाऱ्या गुन्ह्यांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. प्रेमप्रकरणांमध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. असाच एक खळबळजनक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे. नाशिकमध्ये साखरपुड्याच्या दिवशीच होणाऱ्या पत्नीने तिच्या बॉयफ्रेंन्डला मिठी मारल्यामुळे तिच्या होणाऱ्या पतीला जबर धक्का बसला. यानंतर घडलेल्या घडामोडींमुळे खचलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने लग्नाच्याच दिवशी टोकाचं पाऊल उचलत स्वतःला संपवले. मुलाचे लग्न होत असल्याच्या आनंदात असलेल्या कुटुंबियांना या सगळ्या प्रकारामुळे जबर धक्का बसला आहे.

नाशिकमधील एका आयकर अधिकाऱ्यासाठी लग्नाचा दिवस त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला आहे. हरेकृष्ण पांडे असं या आयकर अधिकाऱ्याचं नाव होतं. लग्नासाठी त्यांनी आपल्या जोडीदाराचीही निवड केली होती. मात्र यामुळे त्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागले. होणाऱ्या पत्नीचे प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर तणावाखाली गेलेल्या हरेकृष्ण पांडे यांनी नाशिकमध्ये राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हरेकृष्ण पांडे यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या हरेकृष्ण पांडे यांचा वाराणसीतील एका तरुणीसोबत साखरपुडा झाला होता. मात्र साखरपुड्याच्या वेळी होणारी पत्नी एका तरुणासोबत अधिक जवळीक साधत असल्याचे हरेकृष्ण पांडे यांच्या लक्षात आले. यानंतर हरेकृष्ण यांच्या होणाऱ्या पत्नीने त्या तरुणाला मिठी मारली. हरेकृष्ण यांना तो तरुण कोण आहे हे कळताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तो तरुण हरेकृष्ण यांच्या होणाऱ्या पत्नीचा प्रियकर असल्याचे त्यांना कळाले. यामुळे हरेकृष्ण पांडे हे प्रचंड तणावाखाली गेले आणि त्यांनी या लग्नास नकार दिला.

मात्र यानंतर त्या तरुणीने पांडे यांचा छळ करण्यास सुरुवात केली. लग्नाला नकार देऊ नको नाहीतर  हुंडा प्रकरणात अडकवेन अशी धमकी देण्यास त्या तरुणीने सुरुवात केली. यामुळे हरेकृष्ण अस्वस्थ झाले होते. सततच्या ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रासाला कंटाळून हरेकृष्ण पांडे यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दिवशीच हरेकृष्ण यांनी उत्तमनगरमधील आयकर कॉलनी परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हरेकृष्ण यांच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांना धक्का बसला.

त्यानंतर पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. होणारी पत्नी मोहिनी पांडे, तिचा प्रियकर सुरेश पांडे आणि त्याचा साथीदार मुनेंद्र पांडे या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असून तिघेही फरार आहेत. नाशिक पोलीस तिघांचाही शोध घेत आहेत.

Web Title: Income Tax officer end his life after being fed up with his wife harassment even before marriage.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.