शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्रिवेणी’ या प्रांतीय परिषदेच् उद्घाटन

By admin | Updated: April 5, 2015 00:56 IST

‘त्रिवेणी’ या प्रांतीय परिषदेच् उद्घाटन

नाशिक : खासदार असल्याने देशाच्या विविध राज्यांतील महिलांशी संपर्क येतो. त्यांत महाराष्ट्रातील महिला सर्वाधिक पुरोगामी असल्याचे जाणवते; मात्र जोपर्यंत महिलांना समानतेची वागणूक मिळत नाही, तोपर्यंत देश प्रगतीकडे जाणार नाही, असे मत भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे-खाडे यांनी व्यक्त केले. लायन्स क्लब इंटरनॅशनच्या वतीने आयोजित ‘त्रिवेणी’ या प्रांतीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या ‘महिला व सामाजिकता’ या विषयावर बोलत होत्या. क्लबचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रेमचंद बाफना, नरेंद्र भंडारी, प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव, माजी प्रांतपाल विनोद कपूर, उपप्रांतपाल चंद्रहास शेट्टी, श्रीकांत सोनी, नीलिमा जाधव आदि व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुंडे-खाडे म्हणाल्या की, आपल्या देशात महिलांना देवी, शक्तीचे रूप मानले जाते; मात्र पुरुष व महिला यांच्यातील भेदभाव अद्याप संपुष्टात आलेला नाही. दोन्हींमधील समानता माणसांच्या वागण्यातून जाणवायला हवी. महिलांना सामाजिक बांधिलकीची जाणीव असते आणि ती त्या आई, पत्नी, बहीण या भूमिकेतून सभोवतालच्या माणसांतही रुजवतात. सरकारने महिलांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतली असून, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही मोहीम वेगात सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. प्रारंभी छायाचित्र, स्क्रॅप बुक व कॉफी बुक स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यानंतर धन्वंतरी पूजन करण्यात आले. ‘वेणुनाद’ कार्यक्रमात सहभागी झालेल्या चाळीस बालकांनी बासरीवादन सादर केले. वैद्य विक्रांत जाधव यांनी प्रास्ताविकात क्लबच्या कार्याची माहिती दिली. योगेश कदम यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील सभासद उपस्थित होते. उद्या (दि. ५) सकाळी ९ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून ग्रीन व्ह्यू हॉटेलपर्यंत फेरी काढण्यात येणार आहे. दरम्यान, कार्यक्रम एक तास उशिरा सुरू झाल्यानंतरही भाषणे लांबल्याचे पाहून प्रीतम मुंडे-खाडे यांनी वक्त्यांना टोला लगावला. आपल्या आधीच्या वक्त्यांनी ‘फार वेळ घेणार नाही’ असे सांगत बरीच लांबलचक भाषणे केली. माइक हाती आल्यानंतर अनेकांना तो सोडवत नाही. आपण मात्र तसे करणार नाही. कारण वक्तृत्व हा आपला प्रांत नसल्याचे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)