Inauguration of study at Baragaon Pimpri Vidyalaya | बारागाव पिंपरी विद्यालयात अभ्यासिकेचे उद्घाटन

बारागाव पिंपरी विद्यालयात अभ्यासिकेचे उद्घाटन

ठळक मुद्देबॉटनिकल गार्डनचीही मान्यवरांनी पाहणी केली.

बारागाव पिंपरी : येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये अभ्यासिकेचे उद्घाटन नुकतेच झाले. यावेळी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ ‌संस्थाध्यक्ष प्रवीण जोशी, सचिव मिलिंद पांडे, प्राचार्य अशोक बागुल, उपप्राचार्य संजय सूर्यवंशी, दशरथ जारस, भाऊराव गुंजाळ,एकनाथ फरताले आदी उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या बॉटनिकल गार्डनचीही मान्यवरांनी पाहणी केली. बॉटनिकल गार्डनमध्ये सायकस, ड्रे सिना, अडेनियम, सिल्व्हर डस्ट, पिस्तिया, अडुळसा, गूळ वेल, आळीव, रिठा, निरगुडी, नागवेल आदी जैविक वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी बारागाव पिंपरीचे उपसरपंच योगेश गोराडे, अमोल उगले, अजीज शेख, माणिक उगले, अविनाश कळंबे, ज्ञानेश्वर ताकाटे, बबनराव कापडी, विजय कटके आदी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of study at Baragaon Pimpri Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.