शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘छटा आणि जटा’ प्रदर्शनाचे उद्घाटन

By admin | Updated: September 23, 2015 23:53 IST

‘छटा आणि जटा’ प्रदर्शनाचे उद्घाटन

नाशिक : ध्यान धारणा करणारे साधू, आपल्या जटांचे प्रदर्शन करणारे साधू, नदीच्या पाण्यात सूर मारणारे साधू, डोक्यावरील केसांच्या जटांचे प्रदर्शन करणारे, हट योगा करणारे साधू अशा अनेकविध साधूंच्या भावमुद्रांच्या छायाचित्रणाचे प्रदर्शन अशोकस्तंभ येथील कंसारा कार्यालयात सुरू आहे.छायाचित्रकार किरण तांबट यांनी ‘छटा आणि जटा’ छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून साधूंचे विश्व उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्यातील अनेक क्षण टिपले आहे. प्रत्येक भाविकांना सिंहस्थाबद्दल आकर्षण आणि कुतूहल असते. भाविकांच्या या कुतुहलापोटी किरण तांबट यांनी ‘छटा आणि जटा’ प्रदर्शन महत्त्वाचे ठरेल असे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. या छायाचित्र प्रदर्शनात नाशिक-त्र्यंबक येथील शैव तसेच वैष्णव साधूंच्या जीवनशैलीवर आधारित त्यांचे पेहराव, आभूषणे, गंध लावण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, ध्यान धारणा करून देवाशी एकरूप होण्याची कला अशा अनेक क्षणचित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे. कन्सारा मंगल कार्यालयात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन शनिवारी (दि. २६) संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत खुले असणार आहे. (प्रतिनिधी)