शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचे मध्य प्रदेशमध्ये उत्स्फूर्त स्वागत

By admin | Updated: January 2, 2017 23:22 IST

शिवराजसिंह चौहान : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे सहकुटुंब घेतले दर्शन

त्र्यंबकेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे मध्य प्रदेशमधील जनतेने भरभरून स्वागत केले असून, काळा पैसा हुडकण्यास सरकारला मदतच झाली आहे. जनतेला त्रास झाला; पण या निर्णयाशिवाय गत्यंतरही नव्हते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.  मुख्यमंत्री चौहान त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी सहकुटुंब आले होते. दर्शनविधी झाल्यानंतर ते म्हणाले, मध्य प्रदेशमध्ये कॅशलेस व्यवहार होत असून, जनता समाधानी व आनंदी आहे.
दरवर्षी जानेवारीत ते त्र्यंबकेश्वरी येत असतात. त्यांच्या पूजेचे पौरोहित्य पंडित वामनराव गायधनी, पराग धारणे, मंदिर पिंपरकर, बाळासाहेब कळमकर व गौरव धारणे आदि पुरोहितांनी केले. यावेळी त्र्यंबकेश्वर-इगतपुरीचे प्रांताधिकारी आवर्जून उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, उपनिरीक्षक किरण मेहेर, कैलास आकुले, हवालदार रमेश पाटील, राजू दिवटे आदिंसह अनेक पोलीस हवालदार उपस्थित होते. भाजपाचे अ‍ॅड. गायधनींसह हर्षल भालेराव, संतोष भुजंग, उपेंद्र शिखरे, चेतन थेटे, विष्णू दोबाडे, विजू पुराणिक आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.