शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर बदल्या अखेर रद्द?

By admin | Updated: September 10, 2016 00:54 IST

जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश : तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस

नाशिक : निफाड तालुक्यातील दोघा आरोग्यसेविकांच्या नियमाबाह्य बदल्या अखेर रद्द करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढले आहेत. विशेष म्हणजे संबंधित तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आल्याचे वृत्त आहे.या नियमबाह्य बदल्यांबाबत ‘लोकमत’नेच ६ सप्टेंबर रोजी ‘तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच केल्या परस्पर बदल्या’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून या अनियमिततेबाबत लक्ष वेधले होते. ३१ मे नंतर सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही कारणास्तव बदल्या करण्याचे अधिकार हे विभागीय आयुक्तांना असताना निफाडच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पालखेड व चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोघा आरोग्यसेविकांच्या परस्पर प्रतिनियुक्त्यांचे काढलेले आदेश वादात सापडले होते. वस्तुत: तात्पुरत्या स्वरूपात १५ दिवसांपुरता तात्पुरत्या स्वरूपात बदलीचा अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना काही अति महत्त्वाच्या तातडीच्या प्रसंगी आहे; मात्र १ सप्टेंबर २०१६ रोजी निफाडचे तालुका वैद्यकीय अधिकारी नवलसिंग चव्हाण यांनी दोघा आरोग्यसेविकांच्या पालखेड व चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रतिनियुक्ती स्वरूपात बदल्यांचे आदेश काढले होते. चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत खेरवाडी उपकेंद्रात कार्यरत असलेली आरोग्यसेविका प्रमिला पोपटराव नवले यांची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत जावक क्रमांक/आरोग्य ता.वै.अ./५८/१६ च्या १ सप्टेंबरच्या आदेशान्वये पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पिंपळगाव ब-२ उपकेंद्रांत रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्ती देण्याचे आदेश काढले होते. तसेच पालखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शिरवाडे वणी उपकेंद्रात कार्यरत श्रीमती ए. बी. ठाणेकर या आरोग्यसेविकेची जा.क्र./आरोग्य.ता.वै.अ./५९/१६ च्या १ सप्टेंबर २०१६ च्या आदेशान्वये पालखेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दावचवाडी येथील उपकेंद्रातील रिक्त पदावर प्रतिनियुक्ती देण्याचे आदेश काढले होते. (प्रतिनिधी)