गर्भपाताच्या औषधांची बेकायदेशीर व्रिकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:29 AM2019-08-12T01:29:53+5:302019-08-12T01:31:05+5:30

येथील टिळकपथ परिसरातील एका औषध विक्रीच्या दुकानात संशयित प्रसाद शुक्ला यांनी त्यांचे इतर साथीदार संशयित जयेश रवींद्र नेरकर हा फार्मसिस्ट म्हणून नोकरीसाठी ठेवले. नेरकर याने संशयित विक्रांत देवरेकडून स्त्रियांच्या गर्भपाताची गोळ्या घेत त्याची बेकायदेशीरपणे विक्री करताना मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal sales of abortion drugs | गर्भपाताच्या औषधांची बेकायदेशीर व्रिकी

गर्भपाताच्या औषधांची बेकायदेशीर व्रिकी

Next
ठळक मुद्देतिघांविरुद्ध गुन्हा : अन्न औषध प्रशासनाकडून तक्रार

नाशिक : येथील टिळकपथ परिसरातील एका औषध विक्रीच्या दुकानात संशयित प्रसाद शुक्ला यांनी त्यांचे इतर साथीदार संशयित जयेश रवींद्र नेरकर हा फार्मसिस्ट म्हणून नोकरीसाठी ठेवले. नेरकर याने संशयित विक्रांत देवरेकडून स्त्रियांच्या गर्भपाताची गोळ्या घेत त्याची बेकायदेशीरपणे विक्री करताना मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अन्न औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक सुरेश देशमुख यांना सदर औषधविक्रीच्या दुकानात फार्मसिस्ट म्हणून संशयित नेरकर हा गर्भपाताची औषधे सर्रासपणे बेकायदेशीररीत्या अवैध मार्गाने विक्री करताना आढळून आला. याप्रकरणी देशमुख यांनी संशयित नेरकरसह शुक्ला, देवरेविरुद्ध औषध, सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० तसेच एमपीटी कायदा २००२अन्वये सरकारवाडा पोलीस ठाण्यात देशमुख यांनी फिर्याद दिली. नेरकर याने देवरेकडून स्त्रियांची गर्भपात करणारी औषधे एमटी-कीट, गेस्टप्री नावाच्या गोळ्याऔषधे अवैधरीत्या विक्री करताना आढळून आल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़

Web Title: Illegal sales of abortion drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.