शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

उपनगरीय बाजारांत अवैध वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:26 IST

शहराच्या आजूबाजूला असलेल्या रिंगरोडच्या परिसरांमधील नव्याने उदयास आलेल्या उपनगरे, कॉलन्यांच्या परिसरात भरणाऱ्या दैनंदिन बाजारांमध्ये अज्ञात टोळक्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना ‘स्वच्छता वसुली पावती’ (कोरी करकरीत) हातात देत प्रत्येकी दहा रुपयांची ‘वसुली’ करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक : शहराच्या आजूबाजूला असलेल्या रिंगरोडच्या परिसरांमधील नव्याने उदयास आलेल्या उपनगरे, कॉलन्यांच्या परिसरात भरणाऱ्या दैनंदिन बाजारांमध्ये अज्ञात टोळक्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना ‘स्वच्छता वसुली पावती’ (कोरी करकरीत) हातात देत प्रत्येकी दहा रुपयांची ‘वसुली’ करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महापालिका, पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.आठवडे बाजाराची संकल्पना काळानुरूप बदलली आहे. कारण शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याने आठवडे बाजारदेखील उपनगरांनुसार वाढले आहे. गोदाघाटावर भरणाºया बाजाराव्यतिरिक्त मेरी, म्हसरूळ, निलगिरी बाग, साईनगर, कोणार्कनगर, अमृतधाम चौफुली, रासबिहारी लिंकरोड, पाथर्डीफाटा आदी भागांमध्ये रिंगरोडच्या कडेला मोकळ्या भूखंडांवर बाजाराचे दिवस ठरलेले आहेत. या बाजारांमध्ये किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांपासून स्वयंपाकगृहात लागणाºया वस्तू विक्रेत्यांपर्यंत विविध किरकोळ विक्रेत्यांकडून दुकाने थाटली जातात. मनपाच्या ताब्यातील भुखंडांवर जरी बाजार भरत असला तरी या बाजारात विक्रेत्यांकडून ‘स्वच्छता कर’ वसूल करणारी टोळी मात्र अज्ञात आहे. कारण या टोळीकडून नियमितपणे प्रत्येकी दहा रुपयेविक्रेत्यांकडून घेतले जातात आणि त्यांच्या हातात एसटीच्या तिकिटाच्या आकाराची कोरी करकरीत पावती दिली जाते. या पावतीवर दर दहा रुपये, जागा, ठिकाण, दि., वसुली कारकुनाची सही अशी काही अक्षरे छापील स्वरूपात आहे; मात्र या अक्षरांच्या रकान्यात कुठल्याही-प्रकारची माहिती अथवा स्वाक्षरी, शिक्का नसल्याने विक्रेत्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. ‘दैनंदिन बाजार स्वच्छता वसुली पावती’ म्हणजे काय रे बुवा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रत्येक बाजारात शेकडोंच्या संख्येने विक्रेते अवघे काही तास आपला व्यवसाय करतात. विक्रेत्यांकडून दहा रुपये ‘कर’वसूल केला जातो. ही करवसुली करणारी अज्ञात टोळी रोज आपल्या खिशात मात्र हजारो रुपयांची रक्कम सहज टाकून घेत आहे.‘वसुली कारकून’ नेमका कोण?‘तुम्ही बाकीचे काही बोलू नका, स्वच्छता कर म्हणून मनपाला दहा रुपये द्यायचे जिवावर येते का’ असा प्रतिप्रश्नही विक्रेत्यांना वेळेप्रसंगी ‘टोळी’कडून ऐकावा लागतो. स्वच्छता कर अथवा जागेचे वाजवी शुल्क अधिकृत स्वरूपात मनपाने वसूल केल्यास त्यास विक्रेत्यांची कुठलीही हरकत नाही; मात्र कोरी करकरीत ‘दैनंदिन बाजार स्वच्छता पावती’ हातात देत अवैधरीत्या प्रत्येक विक्रेत्याकडून दहा रुपये वसूल करणारे नेमके कोण? असा प्रश्न शेकडो विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCrime Newsगुन्हेगारीMarketबाजारvegetableभाज्या