शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवभोजन’ लाभार्थ्यांसाठी मिळेल ओळख क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:34 IST

राज्यातील जनतेला अवघ्या दहा रूपात जेवण देण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन थाळी’ योजनेला येत्या २६ रोजी राज्यात प्रारंभ होत आहे. गरजू लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी थाळी घेणाऱ्या प्रत्येकाची नोंददेखील ठेवली जाणार आहे. ही नोंद कशी ठेवणार याविषयी चर्चा आणि तर्कवितर्क लढविले जात असताना शासनाकडे लाभार्थ्यांचे मॉनेटरिंग राहणार असल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देशासनाची लिंक : लाभार्थ्यांचे होणार फोटो क्लिक

नाशिक : राज्यातील जनतेला अवघ्या दहा रूपात जेवण देण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन थाळी’ योजनेला येत्या २६ रोजी राज्यात प्रारंभ होत आहे. गरजू लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी थाळी घेणाऱ्या प्रत्येकाची नोंददेखील ठेवली जाणार आहे. ही नोंद कशी ठेवणार याविषयी चर्चा आणि तर्कवितर्क लढविले जात असताना शासनाकडे लाभार्थ्यांचे मॉनेटरिंग राहणार असल्याची बाब समोर आली आहे.प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शिवभोजन थाळी मिळणार असून, यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दररोजच्या थाळीचा कोटा निश्चित करून देण्यात आलेला आहे. जिल्हाभरातून शहरात कामानिमित्त येणाऱ्यांना अत्यल्प दरात जेवण मिळावे आणि त्यांची परवड होऊ नये म्हणून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. गरजूंपर्यंत योजनेचा लाभ पोहोचतो का याचे मॉनेटरिंग शासनाकडून आॅनलाइन केले जाणार आहे. थाळीचा लाभ घेण्यासाठी शिवभोजन केंद्राच्या काउंटरवर लाभार्थ्यांचे फोटो क्लिक करून संपूर्ण माहिती संगणकात भरली जाईल. त्यानंतर केंद्राच्या संगणकावर संबंधितांचा आयडी क्रमांक जनरेट झाल्यानंतरच थाळी मिळणार आहे.४लाभ घेणाºयांची माहिती आणि थाळीची मोजदाद करण्याच्या दृष्टीने शासनाची सदर आॅनलाइन यंत्रणा काम करणार आहे. आयडी क्रमांक जनरेट झाल्यानंतरच शिवभोजन थाळीचा लाभ मिळेल. या कार्यपद्धतीत लाभार्थ्याचे छायाचित्र, नाव, पत्ता यावरूनच लाभास पात्र होऊ शकेल की नाही याची पडताळणी होणार आहे.‘शासकीय कर्मचाºयांना लाभ नाही’चा फलकया योजनेचा लाभ शासकीय कर्मचाºयांना देता येणार नाही, असा या योजनेत नियम आहे. त्यामुळे शिवभोजन थाळी असलेल्या ठिकाणी शासकीय कर्मचाºयांना लाभ मिळणार नसल्याचे फलक लावण्याची सक्ती केंद्रांवर केली जाणार आहे. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्यांना जास्तीत जास्त लाभ मिळेल आणि शासकीय कर्मचारी असल्याची पडताळणी आॅनलाइन असल्याने असे लोक साहजिकच लाभार्थ्यांच्या रांगेतून बाहेर पडतील अशी ही संपूर्ण यंत्रणा असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :foodअन्न